‘आनंद तरंग’ कार्यक्रमात रंगले व्हायोलिन आणि हार्मोनियम वादन !

पुणे : श्री सिद्धिविनायक मोदी गणपती मंदिर ट्रस्ट आणि कलांगण अकादमी च्या वतीने आयोजित  ‘ आनंद तरंग ‘ या गाण्यांच्या  कार्यक्रमात शनिवारी सायंकाळी व्हायोलिन आणि हार्मोनियम वादन रंगले. ‘स्वरगंध,पुणे’प्रस्तुत या कार्यक्रमात डॉ.नीलिमा राडकर यांनी  व्हायोलिनमधून आणि माधवी करंदीकर यांनी हार्मोनियममधून लोकप्रिय मराठी भक्तीगीते   सहवादनातून सादर केली.अभिजित जायदे,जितेंद्र पावगी(तबला),नरेंद्र काळे (तालवाद्य) यांनी  साथसंगत केली. यशश्री पुणेकर यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले.भट परिवार,संजय गोसावी आदि मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम शनिवार, दि.११ मे    २०२४ रोजी सायंकाळी साडेपाच  वाजता  श्री सिद्धिविनायक मोदी गणपती मंदिर,(नारायण पेठ) येथे  पार पडला.हा कार्यक्रम विनामूल्य होता.विनायक चतुर्थीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.ओम् नमोजी आद्या, तुज मागतो मी,माय भवानी,ओंकार स्वरूपा,मागे उभा मंगेश,अविरत ओठी,रामा रघुनंदना,देव माझा विठू,पांडुरंग नामी,कानडा राजा,आनंदाचे डोही,जय जय हे ओंकारा,विकत घेतला,नरवर कृष्णासमान,कंठातच रूतल्या,राधा कृष्णावरी,रात्र काळी,रचिल्या ऋषिमुनींनी या गीताच्या सादरीकरणाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली.