अमरावतीत राजकीय वातावरण तापलं; बच्चू कडू शिंदेंच्या पाया पडले; अमित शहांची सभा होऊ देणार नाही?

By: Editor_Pratik

On: Tuesday, April 23, 2024 11:26 AM

bacchu kadu
Google News
Follow Us

अमरावतीत वातावरण तापलं आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत. प्रहारकडून सायन्स कोर मैदान हे 23 आणि 24 एप्रिलसाठी आरक्षित करण्यात आलं होतं. पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची उद्या सायन्स कोर मैदानावर सभा होणार आहे. महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांची उद्या सायन्स कोर मैदानावर सभा आयोजित करण्यात आली आहे.

तरुणीला कुरियरमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून फसविले तर ४० वर्षीय व्यक्तीची परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक; पुण्यात नेमकं चाललंय काय?

त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव 23 आणि 24 एप्रिलला प्रहार पक्षाला असलेली परवानगी रद्द करण्यात आली आहे. गृहमंत्री अमित शाह येणार असतील तर 24 तासांआधी सर्व सुरक्षा यंत्रणा कामाला लागते, अशी भूमिका पोलिसांची आहे. पण यामुळे बच्चू कडू प्रचंड आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू यांनी सायन्स कोर मैदानावर ठिय्या मांडला आहे.

पुणेकर हा वडापाव खाल्याशिवाय पुढे जात नाही, असं आहे तरी काय?

अमित शाह यांच्या सभेला परवानगीची गरज नाही. सुरक्षेचं कारण सांगून तुम्ही आमच्या सभेला परवानगी कशी नाकारता? असा प्रश्न बच्चू कडू यांना उपस्थित केला. यावेळी बच्चू कडू यांनी पोलिसांना भाजपचा दुपट्टा गळ्यात घालण्याचा सल्ला दिला. यावेळी पोलीस आणि बच्चू कडू यांच्यात बाचाबाची झाली.

Big News : शिंदे गटातील बड्या नेत्याच्या गाडीवर हल्ला; वाहनावर भिरकावला दगड; कारची काच फुटली

“आम्ही 5 एप्रिलला अर्ज केला होता. त्यानंतर 7 आणि 12 तारखेला अर्ज केला होता. नंतर 18 एप्रिलला आम्हाला या जागेची परवानगी मिळाली. आमच्याकडे प्रशासनाच्या परवानगीची कागदपत्रे आहेत. आम्हाला 23 आणि 24 एप्रिलला सभा घेण्यासाठी परवानगी मिळाली होती. तर खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना 21 आणि 22 तारखेसाठी परवानगी मिळाली होती. आम्हाला परवानगी असूनही इथे येण्यासाठी पोलिसांकडून मज्जाव केला जातोय”, अशी भूमिका बच्चू कडू यांनी मांडली.

ब्रेकिंग : उद्या पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार? काँग्रेसचा बडा नेता काँग्रेस सोडणार

“याउलट राणांना परवानगी नाही. पण त्यांच्या सभेसाठी आम्हाला मज्जाव केला जातोय. अमित शाह यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तुमची परवानगी नाकारली जात आहे, असं पोलीस म्हणत आहेत. पण आम्हाला प्रशासनाने आधीच परवानगी दिली आहे. आमच्याकडे पुरावे आहेत”, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिली.

बापरे! सुप्रिया सुळेंच्या डोक्यावर सुनेत्रा पवार, पार्थ यांचे ५५ लाखांचे कर्ज; पहा किती संपत्ती…

“आम्ही परवानगी मिळाल्यानंतर सर्व पैसे भरले. आम्ही 23 आणि 24 तारखेचे पैसे भरले आहेत. आम्ही सर्व कार्यकर्त्यांना सांगिलतं की, उद्या आमची सभा आहे. पण पोलिसांनी सांगितलं की, तुमची परवानगी बिरवानगी गेली चुल्ह्यात. उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह येणार आहेत. गृहमंत्री येऊनच कायदा आणि आचारसंहिता भंग होत असेल तर मला वाटतं काहीच शिल्लक राहिलेलं नाही”, असं बच्चू कडू म्हणाले.

ED BIG NEWS : पुण्यात चालले काय; ईडीचे पथक पुण्यात, गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यावर छापे

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

July 17, 2026

Trupti Desai

July 15, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026