---Advertisement---

रासायनिक संवर्धनामुळे पुन्हा श्री महालक्ष्मीदेवी मूर्तीची हानी झाल्यास त्याची जबाबदारी निश्‍चित करा !- महाराष्ट्र मंदिर महासंघाचे मागणी

By: Editor_Manas

On: Sunday, April 14, 2024 4:46 AM

Google News
Follow Us
---Advertisement---

कोल्हापूर – महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपिठापैकी एक असलेल्या कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर अनेकदा रासायिक संवर्धन करण्यात आले आहेया सर्व संवर्धनामुळे मूर्तीची स्थिती गंभीर होत असल्याचे अहवालातून समोर आले आहेअसे असतांना आता पुन्हा एकदा १४ आणि १५ एप्रिलला भारतीय पुरातत्व विभागाकडून श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे संवर्धन केले जाणार आहेप्रथम या रासायनिक संवर्धनामुळे पुन्हा श्री महालक्ष्मीदेवी मूर्तीची हानी झाली अथवा काही गडबड झालीतर त्याची पूर्ण जबाबदारी निश्‍चित करावीअशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी तथा पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष अमोल येडगे यांना देण्यात आलेया प्रसंगी श्री एकमुखी दत्त मंदिराचे मठाधिपती श्रीसंतोष गोसावीअखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्रीसंदीप सासणेअंबाबाई भक्त समितीचे श्रीप्रमोद सावंतहिंदु जनजागृती समितीचे श्रीकिरण दुसे आणि श्रीशिवानंद स्वामी हे उपस्थित होते.

या तक्रारीत पुढे म्हटले आहे कीयापूर्वी वर्ष २०१५ पासून अनेकदा करण्यात आलेल्या संवर्धनातून काहीही साध्य होत नसतांना आता पुन्हा मूर्तीचे संवर्धन केले जाणार आहेवर्ष २०१५ मध्ये झालेल्या संवर्धनामुळे मूर्तीवर गंभीर परिणाम झाले आहेतअसा स्पष्ट अहवाल आहेत्यामुळे आता जे संवर्धन होणार आहे त्या संवर्धानामुळे मूर्तीची हानी झालीतर त्याची नेमकी जबाबदारी निश्‍चित करणे आवश्यक आहेही जबाबदारी निश्‍चित होत नाहीतोपर्यंत संवर्धनास स्थगिती देण्यात यावीयाअगोदर ज्यांच्यामुळे मूर्तीची हानी झाली त्या सर्व संबंधितांवर गुन्हे नोंद करावेततसेच मूर्तीचा मुद्दा हा धार्मिक मुद्दा असल्याने त्या संदर्भात संदर्भात संतधर्माचार्यशंकराचार्यांचे विविध पीठ आदींचे मार्गदर्शन घ्यावे.


हिंदु जनजागृती समितीने मोठ्या प्रमाणात विरोध केल्यानंतरही वर्ष २०१५ मध्ये श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीचे रासायिक संवर्धन करण्यात आलेपुरातत्व विभागाने केलेल्या रासायनिक प्रक्रियेतील फोलपणा वर्ष २०१७ मध्येच दिसण्यास प्रारंभ झाला आणि मूर्तीवर पांढरे डाग दिसू लागलेत्या वेळीही परत एकदा रासायनिक प्रक्रिया करण्यात आलीनुकतेच पुरातत्त्व खात्याचे निवृत्त अधिकारी आर्.एस्त्र्यंबके आणि विलास मांगीराज यांनी मूर्तीच्या संदर्भात न्यायालयात सादर केलेल्या अहवालात श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची गळ्याखालच्या भागाची झीज झाली असून ती झीज २०१५ या वर्षी झालेल्या रासायनिक संवर्धनातील अवशेषांची आहेअसे नमूद केले आहेवर्ष २०१५ मध्ये जेव्हा रासायनिक संवर्धन करण्यात आले तेव्हा मूर्तीच्या रासायनिक संवर्धनानंतर मूर्तीच्या स्थितीस प्रक्रिया करणारे पुरातत्त्व खाते सर्वस्वी जबाबदार असेलअसे माननीय जिल्हाधिकार्‍यांनी त्या वेळी सांगितलेअसे असतांना ९ वर्षानंतरही मूर्तीच्या स्थितीस जे जबाबदार आहेत त्यांच्यावर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही ?, असेही मंदिर महासंघाने विचारले आहे.

For Feedback - feedback@example.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 9, 2026

March 9, 2026

March 9, 2026

March 9, 2026

March 9, 2026

March 9, 2026