भारत, २० एप्रिल २०२४: सिम्बायोसिस स्कूल ऑफ कलिनरी आर्ट्स (एसएससीए), ही सिम्बायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड युनिव्हर्सिटी) अंतर्गत असलेली भारतातील प्रख्यात कलिनरी आर्ट्स (पाककला) स्कूल्सपैकी एक आहे. युनिव्हर्सिटी कॉलेज बर्मिंगहम (यूसीबी) यूकेसोबत ऐतिहासिक सामंजस्य कराराची (एमओयू)ची घोषणा करताना एसएससीएला प्रचंड आनंद होत आहे. हा ऐतिहासिक करार यूसीबीचे भारत आणि दक्षिण आशियातील मान्यवर व प्राधिकृत प्रतिनिधी ग्रेशम ग्लोबल यांनी शक्य केला असून कलिनरी शिक्षणातील आंतरराष्ट्रीय सहयोगामध्ये एक खूप महत्त्वाचा क्षण आहे.
या कराराच्या अटीनुसार एसएससीएच्या विद्यार्थ्यांना एसआययूमधून बी.एस्सी.ची (हॉस्पिटॅलिटी आणि कलिनरी मॅनेजमेंट) पहिली दोन वर्षे पूर्ण करता येतील. त्यानंतर उर्वरित दोन वर्षांसठी त्यांना यूसीबीमध्ये बीए ऑनर्स इन कलिनरी मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम यूकेमध्ये इंटर्नशिपसह पूर्ण करण्यासाठी पाठवले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना आपला शैक्षणिक अनुभव समृद्ध करण्याची एक अमूल्य संधी मिळेल. विद्यार्थ्यांना चार वर्षांच्या शिक्षणानंतर दोन्ही विद्यापीठांकडून २ पदव्या (undergraduate degree) मिळतील. सिम्बायोसिस स्कूल ऑफ कलिनरी आर्ट्सच्या (एसएससीए) भारतीय पदवी अभ्यासक्रमात आवश्यक श्रेणी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांना युनिव्हर्सिटी कॉलेज बर्मिंगहममध्ये प्रवेशासाठी अर्ज करता येईल. त्यांना या भागीदारीचा भाग म्हणून विशेष शिष्यवृत्ती दिल्या जातील आणि त्यांना कलिनरी मॅनेजमेंटच्या शिक्षणात प्रगती करणे शक्य होईल. या खास तयार केलेला सहयोगात्मक अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना चार वर्षांत दोन पदव्या मिळवणे शक्य तर करतोच. त्याचबरोबर तो यूकेमध्ये करियरच्या संधींचा शोध घेण्यासाठी मार्गही खुला करतो. तसेच या एमओयूच्या माध्यमातून एसएससीए आणि यूसीबी यांच्या दरम्यान शिक्षकाच्या एक्स्चेंजद्वारे शैक्षणिक देवाणघेवाण व विकास यांचे वातावरण तयार केले जाईल. त्यातून आंतर-सांस्कृतिक शिक्षण आणि विकास या गोष्टी साध्य होतील. या व्यवस्थेला पूरक ठरण्यासाठी मुंबईतील यूसीबीच्या कार्यालयाकडून एसएससीएच्या विद्यार्थ्यांना अर्ज आणि व्हिसासाठी सर्वांगीण मदत केली जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा हा शैक्षणिक प्रवास अधिक सुलभ होईल.
युनिव्हर्सिटी कॉलेज बर्मिंगहमचे कुलगुरू आणि प्राचार्य प्रोफेसर मायकल हार्किन यांनी एसएससीए सोबत काम करण्याबाबत उत्सुकता व्यक्त केली. ते म्हणाले, “हा सामंजस्य करार, कलिनरी आर्ट्स या सातत्याने बदलत्या क्षेत्रात विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचा शिक्षणाचा अनुभव देऊन त्यांना यशस्वी होण्यासाठी तयार करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे द्योतक आहे. सिम्बायोसिस हे भारतातील एक अत्यंत प्रतिष्ठित विद्यापीठ आहे. ती भारतातील विविध क्षेत्रांमध्ये आणि विशेषतः कलिनरी आर्ट्समधील सर्वोत्तम शैक्षणिक संस्थांपैकी एक संस्था आहे. त्यामुळे युनिव्हर्सिटी कॉलेज बर्मिंगहमला कलिनरी तसेच इतर अभ्यासक्रमांसाठी भागीदारी करताना खूप आनंद आणि गौरव वाटत आहे. त्याचबरोबर विद्यार्थी आणि शिक्षकांचा एक्स्चेंज कार्यक्रमही राबविण्यात येईल. आमच्या यूसीबीमधील विद्यार्थी आणि शिक्षकांनाही भारतातील वैविध्यपूर्ण व समृद्ध संस्कृतीतून तसेच पाककलांमधून खूप काही शिकता येईल याबद्दल मला खूप आनंद वाटतो. यूसीबीच्या वतीने आम्ही एसएससीएच्या विद्यार्थ्यांना यूकेमध्ये आणि भारतात कलिनरी आणि इतर शैक्षणिक उपक्रमांमध्ये आमच्याकडील ज्ञान व सुविधांच्या माध्यमातून सर्वोत्तम शैक्षणिक अनुभव देण्यासाठी खूप उत्सुक आहोत.
या ऐतिहासिक सहयोगाबद्दल आनंद व्यक्त करताना सिम्बायोसिस इंटरनॅशनलच्या (डीम्ड युनिव्हर्सिटी) प्रो-चान्सलर डॉ. विद्या येरवडेकर म्हणाल्या की, “ही भागीदारी आमच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि जागतिक संधी देण्याच्या प्रयत्नांमधील एक महत्त्वाचा टप्पा आहे. आमच्या विद्यार्थ्यांना यूकेमधील यूसीबीच्या कॅम्पसमध्ये आपल्या पदवी अभ्यासक्रमाचा एक भाग पूर्ण करण्याची एक खास संधी मिळेल. त्यामुळे त्यांना त्यांच्या समृद्ध शैक्षणिक दर्जा, अद्ययावत सुविधा आणि इंटर्नशिप/ नोकरीच्या संधींचाही लाभ मिळेल. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना एसएससीएमध्ये देत असलेले ज्ञान आणि उद्योगाशी सुसंगत शिक्षण या घटकांशी जुळणारा एक शैक्षणिक भागीदार आम्हाला लाभला आहे याचा मला आनंद वाटतो. शिक्षकांच्या एक्स्चेंजद्वारे दोन्ही संस्थांमधील आंतर-सांस्कृतिक अध्यापन आणि सर्वांगीण संशोधनाला चालना मिळेल.”
परदेशी विद्यापीठांना मार्केट-एन्ट्री सेवा पुरवणारी आघाडीची कंपनी असलेल्या ग्रेशम ग्लोबलचे सहसंस्थापक जसमिंदर खन्ना म्हणाले की, “हा सामंजस्य करार (एमओयू) शक्य करणे ही मागच्या दोन वर्षांपासून चाललेली एक कठीण प्रक्रिया होती. अर्थात, हा प्रयत्न यशस्वी ठरला आहे. त्यातून दोन्ही विद्यापीठांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांना हॉस्पिटॅलिटी आणि कलिनरी अभ्यासक्रम शिकवताना परस्परांच्या ज्ञानाचा प्रचंड लाभ होईल आणि त्यांच्यासाठी अनेक संधींची दारे खुली होतील. ही भागीदारी दोन्ही संस्थांमधील विद्यार्थ्यांसाठी करियरच्या भरपूर संधी निर्माण करेल.”
जागतिक पातळीवरील या सहयोगात सामंजस्य करारावर स्वाक्षरी होणे, हा एक मोठा टप्पा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक संधी निर्माण होतील. त्यातून विद्यार्थ्यांना यूसीबीच्या यूके कॅम्पसमध्ये शिकता येईल आणि अभ्यासक्रमाला जागतिक दृष्टीकोन मिळून त्यांचा शैक्षणिक प्रवास समृद्ध होईल. एसएससीए आणि यूसीबी यांच्यादरम्यान शिक्षकांच्या देवाणघेवाणीमुळे आंतर सांस्कृतिक शैक्षणिक पद्धतींना चालना मिळेल आणि दोन्ही संस्थांना लाभ होईल. हा एमओयू एकूणातच विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी मौल्यवान ज्ञान, अनुभव आणि वाढीच्या संधी घेऊन येईल. त्यामुळे कलिनरी उद्योगात त्यांना यश मिळवणे शक्य होईल.
युनिव्हर्सिटी कॉलेज बर्मिंगहमचे इंटरनॅशनल रिक्रूटमेंटचे संचालक भारत सखुजा यांनी या भागीदारीबाबत आपले मत व्यक्त केले: “ही भागीदारी भारतीय कलिनरी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संधी आणि कौशल्यविस्ताराच्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे. त्यातून भारत आणि यूके यांच्यादरम्यान ज्ञान व पाककौशल्यांची देवाणघेवाण होईल व हॉस्पिटॅलिटी उद्योगाला एक वेगळा आयाम मिळू शकेल. आम्ही या भागीदारीमुळा निर्माण होणाऱ्या संधींबाबत खूप आनंदी आहोत आणि एसएससीएसोबत हे नाते आणखी मजबूत करण्यासाठी उत्सुक आहोत.”