पुणे : स्वान फाऊंडेशन आणि बुद्धिस्ट नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने बुध्दिस्ट स्टार्टअप समिटचे आयोजन केले आहे. येत्या शनिवारी (दि. १३ एप्रिल) सकाळी १०.३० वाजता भाऊ इन्स्टिट्यूट, सीओईपी पुणे येथे राज्याचे महिला व बाल विकास आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही समिट होणार आहे. स्टार्टअप आणि नवउद्योजकांना सक्षम बनवण्याचा उद्देश या समिटचा आहे, अशी माहिती स्वान फाऊंडेशनचे अध्यक्ष शशिकांत कांबळे आणि बुद्धिस्ट नेटवर्कचे भुषण गायकवाड यांनी दिली.
शशिकांत कांबळे म्हणाले, “ज्या काळात जातीयतेचे सोंग माजले होते, त्या काळात एखाद्या अस्पृश्य युवकाने आपला व्यवसाय करावा, अशी संभावनाच नव्हती. अशा प्रतिकुल परिस्थितीत एका युवकाने स्टार्टअप सुरु करण्याचे धाडस दाखविले. ते वर्ष होते १९१७ आणि त्या युवकाचे नाव होते डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. पुढील दशकात लोक त्यांना प्रेमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत. त्या युवकाच्या धाडसी प्रयत्नाला अभिवादन म्हणून स्वान फाऊंडेशन आणि बुद्धिस्ट नेटवर्कच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये स्टार्टअप समिटचे अयोजन केले जात आहे.”
भुषण गायकवाड म्हणाले, “या समिटमध्ये सरकारी योजना आणि कार्यक्रम, नेटवर्क इव्हेंटस, बिझनेस मॉडलिंग, व्हेंचर डेव्हलपमेन्ट, कल्पनेपासुन अंमलबजावणीपर्यंतची मदत याविषयी चर्चा होणार आहे. यापूर्वी बुद्धिस्ट नेटवर्कने नागपुरमध्ये समिटचे यशस्वी आयोजन केले होते. या समिटमध्ये सहभागी होण्यासाठी ९७६२३५२४६९ या नंबरवर किंवा https://rzp.io/l/BYV3kGl या लिंकवर संपर्क साधावा.”