पुणे : भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत ‘गीत सुमनांजली ‘ या भावगीत मैफिलीचे दि.१३ एप्रिल २०२४ रोजी आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ व्हायोलिनवादक पं. प्रभाकर जोग आणि ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या गाजलेल्या भावगीतांचे सादरीकरण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.वीणा जोगळेकर,दीपक कुलकर्णी हे भावगीते सादर करणार आहेत.चारुशिला गोसावी (व्हायोलिन ),ओमकार पाटणकर (तबला),उद्धव कुंभार (साईड रिदम) हे साथसंगत करणार आहेत. स्मिता अमृतकर या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.
हा कार्यक्रम शनिवार,१३ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी साडे पाच वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे होणार आहे.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २०१ वा कार्यक्रम आहे.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली.