टाटा एआयए लाईफचा नवा टाटा एआयए रायजिंग इंडिया फंड

मुंबईमार्च २०२४:  भारतातील आघाडीच्या जीवन विमा कंपन्यांपैकी एक, टाटा एआयए लाईफ इन्श्युरन्सने (टाटा एआयए) टाटा एआयए रायजिंग इंडिया फंड लॉन्च केला आहे. हा फंड भारताच्या विकास यात्रेत सहभागी होण्यासाठीच्या संधींचे द्वार ग्राहकांसाठी खुले करत आहे. एनएफओ ३१ मार्च २०२४ पर्यंत खुली राहील. एनएफओ कालावधीत युनिट्स १० रुपये प्रति युनिट एनएव्हीवर प्रस्तुत केले जातील.

रायजिंग इंडिया फंड अशा प्रमुख क्षेत्रांमध्ये आणि कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल, ज्या आत्मनिर्भर भारताच्या घोडदौडीला वेग मिळवून देत आहेत. यामध्ये पायाभूत सोयीसुविधा, उत्पादन, बँकिंग, डिजिटल, संरक्षण इत्यादींचा समावेश आहे. हा फंड विविध मार्केट कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करेल आणि सेक्टर एग्नोस्टिक असेल, ज्यामुळे फंड मॅनेजर भारताच्या विकास इंजिनाला चालना देणाऱ्या विविध संधींचा लाभ घेण्यात सक्षम बनतील.

टाटा एआयएचे पॉलिसीधारक या फंडमध्ये अनेक विविध उत्पादनांमार्फत गुंतवणूक करू शकतात, यामध्ये प्रो-फिट, परम रक्षक, परम रक्षक प्लस, परम रक्षक II, परम रक्षक आरओपी, परम रक्षक IV, परम रक्षक प्रो, परम रक्षक एलिट यांचा समावेश आहे. यामध्ये ग्राहकांना जीवन विमा कव्हरच्या संरक्षण घेऊन आपल्या प्रियजनांना सुरक्षित ठेवण्याबरोबरीनेच इक्विटीच्या दीर्घकालीन वृद्धी क्षमतेचे लाभ मिळवण्याची अनोखी संधी देखील मिळते.

हल्लीच्या काही वर्षात टाटा एआयए लाईफने युनिट लिंक्ड उत्पादनांच्या विविध पोर्टफोलिओसह गुंतवणुकीच्या नवीन संधी सातत्याने प्रदान केल्या आहेत. त्यांच्या उत्पादनांनी सातत्याने बेंचमार्कपेक्षा सरस कामगिरी बजावली आहे आणि अधिक चांगला परतावा मिळवून दिला आहे. खाली दिलेला तक्ता टाटा एआयए युलिपची कामगिरी दर्शवतो.

आत्मनिर्भर बनण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी भारताने विशेष धोरण अवलंबिले आहे. भारताच्या या धोरणाचे पाच आधारस्तंभ आहेत – अर्थव्यवस्था, पायाभूत सेवा, यंत्रणा, लोकसंख्या आणि मागणी. आत्मनिर्भर उपक्रम चालवत भारत जगभरातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, ज्यामध्ये देशांतर्गत आर्थिक संपत्तीमध्ये प्रभावी वाढ होत आहे, रोजगार संधी वाढत आहेत, युवकांच्या रोजगार क्षमतांचा विकास होत आहे आणि इक्विटी मार्केटमध्ये लक्षणीय वृद्धी होत आहे, त्यामुळे ग्लोबल पॉवरहाऊस हे भारताचे स्थान अधिक मजबूत झाले आहे. वेगाने वाढत असलेला मध्यम वर्ग आणि खूप मोठ्या औद्योगिक क्षेत्रासह भारतात अनेक गुंतवणूक संधी निर्माण होत आहेत व आपला देश शाश्वत वृद्धीसाठी सज्ज आहे.