पुण्यातील तज्ज्ञ डॉ. प्राची साठें याना क्रिटिकल केअर मेडिसिनमधील अमूल्य योगदानासाठी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

पुणे, मार्च २०२४: क्रिटिकल केअर मेडिसिनमधील प्रतिष्ठित तज्ज्ञ डॉ. प्राची साठे यांना कोलकाता येथे झालेल्या क्रिटीकेअर २०२४ परिषदेत गंभीर आजारातील वैद्यकीय व्यवस्थापनातील विविधता, समानता आणि सर्वसमावेशकता यामध्ये त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल गौरविण्यात आले. वैविध्य आणि सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ. साठे यांच्या अथक समर्पणाचा रुग्ण केंद्रित शुश्रुषा आणि वैद्यकीय परिसंस्थेमध्ये खोलवर परिणाम झाला आहे, ज्यामुळे त्यांनी एक प्रशंसनीय मापदंड प्रस्थापित केले आहे.

ही ओळख त्यांचे उत्कृष्ट नेतृत्व आणि आरोग्यसेवेतील DEI तत्त्वे पुढे नेण्यासाठी दृढ वचनबद्धतेला अधोरेखित करते, आणि जगभरातील सहकाऱ्यांसाठी प्रेरणा म्हणून काम करते. क्रिटीकेअर २०२४ परिषद, ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी आणि गंभीर आजारांच्या औषधातील कामगिरीचा आणि अमूल्य योगदान देणाऱ्यांचा  सन्मान करण्यासाठीचा एक महत्वाचा व्यासपीठ आहे, जे आरोग्यसेवा पद्धतींमध्ये विविधता आणि सर्वसमावेशकता स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित करते. त्याचेच एक प्रशंसनीय उदाहरण म्हणून डॉ. साठे यांच्याकडे पहिले जाते.