पुणे, २७ मार्च २०२४ : भारताचा क्रमांक एकचा निर्यात ब्रँड असलेल्या सोनालिका ट्रॅक्टर्सला शेतीच्या यांत्रिकीकरणामध्ये परिवर्तनकारी मार्ग चोखाळताना आनंद होतो. कंपनीने आपल्या ‘एक राष्ट्र, एक ट्रॅक्टर‘ एकाच किमतीत या उपक्रमांतर्गत एक नवीन योजना सुरू केली आहे. भारतातील आपली हेवी ड्यूटी ट्रॅक्टर श्रेणीचा विस्तार करत सोनालिकाने आपला नवीनतम सिकंदर डीएलक्स डीआय६० टॉर्क प्लस मल्टीस्पीड ट्रॅक्टर ८,४९,९९९ रुपयांच्या (एक्स-शोरूम) या खास कंपनीच्या किमतीत सादर केला आहे. अगदी कठीण मातीतही चमकदार कामगिरी करण्यासाठी श्रेष्ठ टॉर्क देण्यासाठी याची रचना करण्यात आली आहे. या श्रेणीतील सर्वात मोठे इंजिन त्यात असून शेतीत/शेतीतून दूर दमदार कामगिरी करण्यासाठी त्यात १० डिलक्स फिचर आहेत. सोनालिकाच्या हेवी ड्यूटी ट्रॅक्टर श्रेणीतील नवीन ट्रॅक्टरसुद्धा कंपनीच्या होशियारपूर, पंजाब येथील जगातील क्रमांक एकच्या कारखान्यातून लवकरच बाहेर पडतील.
सोनालिकाचे नवीनतम उत्पादन सिकंदर डीएलक्स डीआय६० टॉर्क प्लस मल्टीस्पीड ट्रॅक्टर हा तिच्या अत्यंत नावाजलेल्या सिकंदर डीएलक्स मालिकेत एक क्रांतिकारक नवी भर आहे. सोनालिकाचा वारसा पुढे नेत या नवीन ट्रॅक्टरमध्ये या श्रेणीतील सर्वात मोठे ४ सिलिंडर ४,७०९ सीसी एचडीएम इंजिन असून ते अतुल्य असा २७५ एनएम टॉर्क पुरवते. यात शटल टेक तंत्रज्ञानासोबत १२एफ+१२आर मल्टीस्पीड ट्रान्समिशन असून श्रेष्ठ असे 5जी हायड्रॉलिक्स आहे. यात २,२०० किलो लिफ्ट क्षमता असून १४० पेक्षा अधिक सेटिंग्ज आहेत. एलईडी डीआरएल हेडलाईट, एलईडी टेल लाईट, प्रो+ बंपर, डिलक्स सीट आणि पॉवर स्टिअरिंग असलेला सिकंदर डीएलक्स डीआय६० टॉर्क प्लस मल्टीस्पीड ट्रॅक्टर अनेकविध वापर आणि अवजारांसाठी एकमेव आहे. भारतीय शेतीच्या विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी त्याची रचना झाली आहे.
या नवीन उत्साहवर्धक उत्पादनाबाबत बोलताना, इंटरनॅशनल ट्रॅक्टर्स लिमि़टेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. रमण मित्तल म्हणाले, “आमचा नवीनतम उपक्रम ‘एक राष्ट्र, एक ट्रॅक्टर किंमत‘ सुरू करताना आणि क्रांतिकारक व उद्योगातील पहिला नाविन्यपूर्ण सिकंदर डीएलक्स डीआय६० टॉर्क प्लस मल्टीस्पीड ट्रॅक्टर सादर करताना आम्हाला आनंद होत आहे. तो शेतकऱ्यांना लवचिकता देऊन सर्वश्रेष्ठ निवड करण्याची क्षमता पुरवतो. भारतीय ट्रॅक्टर उद्योगातील कामगिरीच्या निकषांमध्ये तो क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणेल. यात त्याच्या वर्गातील सर्वात मोठे इंजिन असून ते १२एफ+१२आर मल्टीस्पीड ट्रान्समिशन, प्रगत 5जी हायड्रॉलिक्स आणि १० डिलक्स वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे अनेक प्रकारच्या शेतीच्या वापरासाठी तो परिपूर्ण बनला आहे. आम्ही तो संपूर्ण देशभरात एकाच किमतील उपलब्ध करून दिला आहे. हीसुद्धा उद्योगात पहिल्यांदाच घडणारी गोष्ट आहे. आमचे सर्वात ऩवीन उत्पादन हे गेल्या महिन्यात सादर झालेल्या सर्वात व्यापक अशा ४०-७५ एचपीच्या टायगर ट्रॅक्टर श्रेणीला पूरक ठरेल. पुढे जात असताना आमच्या हेवी ड्यूटी ट्रॅक्टर श्रेणीमध्ये अशा महत्त्वाच्या भर आम्ही पुढेही घालत राहू.”