ड्यूलक्स वेदरशील्डच्या नव्या ब्रॅंड अम्बॅसडरपदी रॉकिंग स्टार यशची नियुक्ती    

पुणे, मार्च २०२४: ॲक्झोनोबेल इंडिया ही पेंट्स आणि कोटींग्जची एक आघाडीची कंपनी आणि ड्यूलक्स पेंट्सची निर्माती कंपनी आहे. भारतात आपल्या ड्यूलक्स वेदरशील्ड एक्स्टीरियर इमल्शन्ससाठी नवीन ब्रॅंड अम्बॅसडर म्हणून या कंपनीने आज अभिनेता यशचे नाव जाहीर केले.यशच्या सोबतीने उत्तम परफॉर्मन्सच्या शोधात असणाऱ्या आणि सौंदर्याच्या भोक्त्या ग्राहकांचे आणि ड्यूलक्स वेदरशील्ड एक्स्टीरियर इमल्शन्सचे नाते घट्ट जुळवण्याचा ॲक्झोनोबेलचा उद्देश आहे.

ॲक्झोनोबेल इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव राजगोपाल म्हणाले, “रॉकिंग स्टार यशचे आमच्या परिवारात स्वागत करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. नावीन्यपूर्णतेच्या आत्मविश्वासातून येणारी अस्सलता आणि अतुलनीय परफॉर्मन्स हे ड्यूलक्स वेदरशील्डचे गुण यशमध्ये मूर्त स्वरूपात दिसून येतात. आमच्या खास ड्यूलक्स वेदरशील्ड एक्स्टीरियर इमल्शन्स प्रमाणेच यश एक खराखुरा सुपरस्टार आहे आणि त्याने भारतभरातील लक्षावधी चाहत्यांचे प्रेम मिळवले आहे.”

सुपरस्टार यश म्हणतो, “प्रत्येक भूमिका प्रेरित करण्याची, लक्ष वेधून घेण्याची आणि मनोरंजन करण्याची क्षमता घेऊन येते. माझी ही मोठी ताकद आहे की मी प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरतो. ड्यूलक्स वेदरशील्ड एक्स्टीरियर इमल्शन्सप्रमाणेच या ताकदीचा उपयोग करून, माझ्या मूल्यांशी एकनिष्ठ राहून अनेक लोकांच्या जीवनात रंग भरणे मला महत्त्वाचे वाटते. ड्यूलक्स वेदरशील्डची ‘इट्स कलरफुल. इट्स पॉवरफुल’ कहाणी साकारण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद होत आहे. आपले जीवन जर एकाच, नीरस रंगाचे नसते, तर मग आपले घर का बरे तसे असावे?”

मलेन लिन्टास दिल्ली यांनी बनवलेले हे अभियान सुरू करताना एका पत्रकाराने यशला विचारले की, रंगीत (कलरफुल) हे दमदार (पॉवरफुल) कसे होऊ शकते? आपल्या खास शैलीत यशने ड्यूलक्स वेदरशील्ड पॉवरफ्लेक्सला अविरत सूर्यप्रकाश, मुसळधार पावसापासून ते सॅंडस्टॉर्मपर्यंत सगळ्या निकषांवर तपासून पाहिले. ट्रिपल डीफेन्स टेक्नॉलॉजी मुळाशी असलेली ड्यूलक्स वेदरशील्डची प्रत्येक छटा ह्याची खातरजमा करते की, होम एक्स्टीरियर्स प्रदीर्घ काळ चमकदार आणि सुरक्षित राहतील. त्यामुळेच तर ‘इट्स कलरफुल. इट्स पॉवरफुल’ हे सार्थ ठरते.

पेंट्स, ॲक्झोनोबेल इंडियाचे मार्केटिंग अँड सेल्स युनिट डायरेक्टर रोहित टोटला म्हणाले, “२५ वर्षांपेक्षा जास्त काळापासून ड्यूलक्स वेदरशील्ड हा होम एक्स्टीरियर्ससाठी अग्रणी टेक्नॉलॉजीचा पर्याय आहे. एक्स्टीरियर इमल्शन्स हा ॲक्झोनोबेलच्या भारतातील डेकोरेटिव्ह पेंट व्यवसायाचा खूप मोठा भाग आहे. आमच्या ब्रॅंडच्या विस्ताराबरोबरच यशच्या मदतीने आमचा ग्राहक संपर्क सचेत करण्याचा आमचा उद्देश आहे.”