रणजीत कुलकर्णी यांची एसेसोमध्ये विभागप्रमुख पदी नियुक्ती संशोधन आणि धोरणात्मक संपादन उपक्रमांचे करणार नेतृत्व

पुणे, मार्च २०२४ : जीवन विमा क्षेत्रात क्रांतीकारक बदल घडवून आणणारी अग्रणी बाजारपेठ निर्मिती कंपनी एसेसोने रणजीत कुलकर्णी यांची संशोधन आणि धोरणात्मक संपादन विभागप्रमुख पदी नियुक्ती करण्याची घोषणा केली आहे. जीवन विमा उद्योगात ३५ वर्षांपेक्षा अधिक अनुभव बाळगणारे रणजीत कुलकर्णी आपल्या समृद्ध अनुभव आणि दृष्टीसह नव्या भूमिकेत असणार आहेत.

आपल्या नव्या भूमिकेत रणजीत हे सी टू बी प्लॅटफॉर्मचा पुरेपूर वापर करण्यासाठी एसेसोच्या टीमचे नेतृत्व करतील.एलआयसी पॉलिसी धारकांसाठी त्यांची विशेष रचना करण्यात आली आहे. अलिप (असाइनमेंट ऑफ लाइफ इन्शुरन्स पॉलिसीज) असे त्यांना म्हणतात. ज्या पॉलिसीधारकांना आपल्या एलआयसी पॉलिसी सरेंडर करायच्या आहेत किंवा जिथे पॉलिसी बंद झाली आहे त्यांना हा प्लॅटफॉर्म पर्याय उपलब्ध करून देतो. त्यामुळे पॉलिसीधारकांचे जीवन विम्याचे संपूर्ण छत्र हिरावून घेतले जाणार नाही याची हमी मिळते. याशिवाय एजंट/विमा सल्लागार यांचे उत्पन्न कायम राहीलयासाठीही हा प्लॅटफॉर्म मदत करतो.

गणिताचा ध्यास हा रणजीत यांचा विमा क्षेत्रातील प्रवासाचा आरंभ ठरला. विमा उत्पादनांच्या गुंतागुंतीतून विश्लेषणाद्वारे मार्ग काढण्याच्या त्यांच्या कौशल्याचा तो आधार ठरला. रणजीत हे विमा व्यवसाय विकासातील तिसऱ्या पिढीचे व्यावसायिक असून त्यांच्या असामान्य कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. उत्तम कामगिरी करणाऱ्या अनेक विमा सल्लागारांसाठी त्यांनी मार्गदर्शक म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. आपली भूमिका सर्वोत्तम रीतीने पार पाडण्यासाठी तसेच क्षमतेचा पूर्ण उपयोग करण्यासाठी रणजीत यांनी त्यांना बळ दिले आहे.

 रणजीत यांच्या नियुक्तीबद्दल मत व्यक्त करताना एसेसोचे संस्थापक केतन मेहता म्हणाले, संशोधन आणि धोरणात्मक संपादन विभागप्रमुख म्हणून एसेसोच्या टीममध्ये रणजीत कुलकर्णी यांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. उद्योगातील त्यांचा व्यापक अनुभव आणि उत्कृष्टतेवर असलेली अढळ निष्ठा यामुळे पॉलिसी धारकांना सशक्त  करण्याच्या तसेच जीवन विमा क्षेत्राचे चित्र बदलून टाकण्याच्या आमच्या मिशनला पुढे नेण्यात रणजीत हे कळीची भूमिका निभवतील. आमच्या ग्राहकांना नाविन्यपूर्ण उत्पादने देण्यामध्ये अग्रणी म्हणून एसेसोला त्यांचे नेतृत्व आणखी पुढे नेईल.

आपला आनंद व्यक्त करताना रणजीत म्हणाले, एसेसोत रुजू होऊन पॉलिसीधारकांना नाविन्यपूर्ण उत्पादने देण्याच्या त्यांच्या मिशनमध्ये योगदान देणे हा माझा सन्मान आहे. जीवन विमा बाजारपेठेत अग्रणी म्हणून एसेसोचे स्थान बळकट करण्यासाठी टीमसोबत काम करण्यास मी सज्ज आहे.

भारतीय जीवन विमा महामंडळाने जारी केलेल्या ४० कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याच्या एंडोमेंट पॉलिसींना साह्य करून एसेसो आणि तिच्या सहयोगी कंपनीने पॉलिसीधारकांचे सशक्तिकरण करण्यासाठी मोठे समर्पण दाखवले आहे. व्यावसायिकता आणि तज्ञता याबद्दल एसेसोची ख्याती आहे. भारतीय जीवन विमा महामंडळाच्या योजना आणि उत्पादने यांची एसेसोकडे सखोल माहिती आहे. त्यामुळे विश्वासार्ह अधिकारी कंपनी म्हणून ती या क्षेत्रात वेगळी उभी आहे.

एसेसोची कम्पलेट सेकंडरी लाइफ ॲसेट मॅनेजमेंट सेवाक्षमता ही सेबीकडे नोंदणीकृत असलेल्या स्वतंत्र कंपनीच्या माध्यमातून पुरविल्या जाते. त्यामुळे उद्योगा मजबूतपणे उभे राहण्यासाठी तिला बळ मिळते. ती पॉलिसीधारकांना त्यांच्या संपूर्ण प्रवासात अखंड आधार पुरवते. संशोधन आणि धोरणात्मक संपादन विभागाच्या प्रमुखपदी रणजीत कुलकर्णी यांच्या नियुक्तीतून एसेसोने पॉलिसीधारकांना असामान्य मूल्य देण्यासाठी तसेच विमा उद्योगात आघाडीची कंपनी म्हणून आपले स्थान बळकट करण्यासाठी आपली कटिबद्धता पुन्हा दाखवली आहे.