‘वंशज’ मालिकेत एका धनाढ्य, उच्चभ्रू उद्योजकाच्या रूपात गुरप्रीत सिंहचे पदार्पण

सोनी सबवरील ‘वंशज’ मालिकेत वडीलोपार्जित सत्ता आणि संपत्तीचा वारस नक्की करण्यातली आव्हाने दाखवली आहेत आणि आजवर पुरुषांना वारस म्हणून नेहमी कसे जास्त अधिकार मिळाले आहेत, याकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. अलीकडच्या भागांमध्ये संपत्तीच्या वाट्यांवरून युक्ती (अंजली तत्रारी) आणि डीजे (माहिर पांधी) यांच्यातील तणाव वाढला आहे आणि एकमेकांना नामोहरम करण्यासाठीते वेगवेगळ्या योजना आखत आहेत. एकीकडे, त्या दोघांमधली चढाओढ शिगेला पोहोचली आहे तर दुसरीकडे याच वेळी काही नवीन चेहरे कथानकात दाखल होत आहेत, ज्यांच्या येण्याने कथेत आणखी आडवळणे येणार हे अटळ आहे.

‘वंशज’च्या विश्वात आणखी खळबळ माजवण्यासाठी मिस्टर रफीक बेग या हुशार उद्योजकाच्या रूपात एक नवा गडी दाखल झाला आहे. अभिनेता गुरप्रीत सिंह ही भूमिका करत आहे. मिस्टर बेग एक उच्च अभिरुचीसंपन्न,आधुनिक वळणाचा सद्गृहस्थ आहे. त्याच्या हालचालीत एक शालीनता आणि अधिकार झळकतो.त्याला शायरी आणि गझलची आवड आहे, जी त्याच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच शान देते. त्याच्या हालचालींमधून त्याचे ऐश्वर्य आणि प्रभाव दिसून येतो. मुलतानी आणि महाजन यांच्यातील विलीनीकरणात त्याची मोठी भूमिका असणार आहे. त्यामुळे त्याच्या आगमनामुळे नवीन नाती, नवीन शत्रुत्व जन्म घेतील.

मिस्टर रफीक बेग ही भूमिका साकारत असलेला अभिनेता गुरप्रीत सिंह म्हणतो, “वंशज मालिकेत मिस्टर रफीकची भूमिका करत असल्याचा मला आनंद वाटतो. अशी प्रभावी भूमिका मला मिळाली हा माझा सन्मानच आहे. त्याची अभिरुची आणि उर्दू कवितेबद्दलचे त्याचे प्रेम यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाला भारदस्तपणा येतो. त्याची आगळीवेगळी शैली, अधिकारवाणी यामुळे ही व्यक्तिरेखा साकारणे आव्हानात्मक होते. प्रेक्षक बघतील की, इतक्या सगळ्या समर्थ लोकांमध्ये मिस्टर रफीक कथेला आणखीन एक पदर जोडतील.मुलतानी आणि महाजन यांच्यातील विलीनीकरणातत्याचे वागणे मुत्सद्दी असेल आणि दोन्ही पक्षांना लाभ करून देण्याची त्याची निष्ठा यामुळे ‘वंशज’मधला लढा अधिक रंगतदार होणार आहे”

बघत रहा, ‘वंशज’ फक्त सोनी सबवर, दर सोमवार ते शनिवार सायंकाळी 7 आणि रात्री 10 वाजता!