डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज लिमिटेड (बीएसई:५००१२४, एनएसई:डीआररेड्डी, एनवायएसई:आरडीवाय, एनएसईआयएफएससी:डीआररेड्डी, यापुढे डॉ. रेड्डीज असा उल्लेख) या जागतिक स्तरावरील फार्मास्युटिकल कंपनी तर्फे आज ही घोषणा करण्यात आली की त्यांनी सनोफी हेल्थेकेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएचआयपीएल) बरोबर त्यांच्या लसींच्या ब्रॅन्ड्सचे वितरण हे संपूर्ण भारतातील खाजगी बाजारपेठेत करण्यासाठी भागीदारी करण्यात आली आहे.
या करारा अंतर्गत डॉ. रेड्डीज कडे सनोफीच्या प्रतिथयश आणि विश्वसनीय अशा लहान मुलांच्या आणि वयस्कांच्या लसींच्या ब्रॅन्ड्सच्या वितरणाचे आणि प्रसाराचे हक्क प्राप्त झाले असून या मध्ये हेक्झाझिम, पेंटॅक्झिम, टेट्राक्झिम, मेनाक्ट्रा, फ्लुक्वाड्री, अडासेल आणि अव्हॅक्झिम ८० यू यांचा समावेश आहे. आयक्यूव्हीआयए एमएटी च्या फेब्रुवारी २०२४ च्या आकडेवारीनुसार या ब्रॅन्ड्सच्या विक्रीची अंदाजे आकडेवारी ही रु ४२६ कोटी आहे. सनोफी कडे या उत्पादनांचे देशात उत्पादन, मालकी आणि आयात करण्याचे सर्व हक्क अबाधित राहतील.
सनोफीच्या भारतातील व्हॅक्सिन विभागाच्या जनरल मॅनेजर प्रीती फुतनानी यांनी सांगितले “ गेल्या काही वर्षांत भारतात लशीचा आत्मविश्वास सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. तरीही, उर्वरित देशातील लसीकरण न झालेल्या मोठ्या गटासाठी बरेच काही करणे बाकी आहे. भारताप्रती आमची दीर्घकालीन बांधिलकी पूर्ण करण्यासाठी आणि भौगोलिक व्याप्ती वाढविण्यासाठी, आम्हाला डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (डॉ. रेड्डीज) बरोबर विशेष वितरण आणि प्रसारणासाठी भागीदारी करताना आनंद होत आहे. आम्हाला विश्वास आहे की या भागीदारी मुळे लसी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचून लसीमुळे बचाव होऊ शकणार्या रोगांपासून लाखो लोकांचे प्राण वाचविण्याच्या आमच्या वचनाला आणखी बळ देईल.”
डॉ. रेड्डीजच्या ब्रॅन्डेड मार्केट्स (भारत आणि इमर्जिंग मार्केट्स) चे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर एम. व्ही रामण्णा यांनी सांगितले “ आरोग्य सेवा व्यावसायिकांशी संबंध दृढ करण्यासाठी आणि भारतात सनोफीच्या सुस्थापित आणि विश्वसनीय लसींच्या ब्रँड्सचा प्रवेश वाढविण्यात मदत करण्यासाठी प्रसार आणि वितरणातील आमच्या सामर्थ्याचा फायदा घेण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला आनंद होत आहे. धोरणात्मक सहकार्याच्या माध्यमातून भारतातील रुग्णांपर्यंत नवीनतम, नाविन्यपूर्ण आणि विश्वसनीय औषधे पोहोचविण्यासाठी आम्ही पसंतीचा भागीदार बनण्याचा आमचा प्रयत्न सुरु ठवतो. हा पोर्टफोलिओ आता डॉ. रेड्डीजला लस क्षेत्रात मजबूत उपस्थिती देतो, ज्यामुळे आम्ही भारतातील लस कंपन्यांमध्ये दुसर्या स्थानावर पोहोचलो आहोत. प्रत्येक उत्पादन आणि भागीदारीच्या माध्यमातून २०३० पर्यंत १.५ बिलियन रुग्णांना सेवा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.