हॉकी पंजाबला हरवून हॉकी मिझोराम संघ पूल एफमधून उपांत्यपूर्व फेरीत

पुणे, मार्च 2024: हॉकी मिझोरामने हॉकी पंजाबचा 4-2 असा पराभव करत14व्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत पूल एफमधून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. अंतिम आठ संघांमध्ये स्थान मिळवणारा तो सातवा संघ ठरला.

मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम, नेहरूनगर, पिंपरी येथे सुरू असलेल्या स्पर्धेतील सोमवारच्या विजयामुळे हॉकी पंजाबने तिन्ही सामन्यांत विजय मिळवत हॉकी हिमाचल आणि हॉकी राजस्थानला मागे टाकत पूल एफमध्ये अव्वल स्थान पटकावले आणि आगेकूच केली.

लालरिनपुयीने (सहाव्या आणि नवव्या मिनिटाला) तर कर्णधार एच. लालरुआतफेली (26व्या मिनिटाला) आणि मरीना लालरामघाकी (54व्या मिनिटाला) तर कर्णधार एच. लालरुआतफेलीने (26व्या मिनिटाला) दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलात रुपांतर करताना हॉकी मिझोरामच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

हॉकी पंजाबकडून तरनप्रीत कौर (35व्या मिनिटाला) आणि राजविंदर कौरने (51व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरद्वारे प्रत्येकी एक गोल केला.

विजयी हॅट्ट्रिकसह हॉकी मिझोराम संघाने हॉकी मध्य प्रदेश, हॉकी महाराष्ट्र, हॉकी झारखंड, हॉकी हरियाणा, हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा आणि हॉकी बंगालसोबत बाद फेरीत स्थान मिळवले. उपांत्यपूर्व फेरीतील आठवा संघ पूल जीमधून आगेकूच करेल.

उपांत्यपूर्व फेरीत हॉकी मध्य प्रदेशची गाठ हॉकी बंगालशी, हॉकी झारखंडची गाठ हॉकी मिझोरामशी आणि हॉकी हरियाणाची लढत हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशाशी होणार आहे.

उपांत्यपूर्व फेरीतील हॉकी महाराष्ट्राच्या प्रतिस्पर्ध्याचा निर्णय मंगळवारी होईल.  त्यांचा सामना पूल जीमधील विजेत्यांशी होईल.

दरम्यान, सोमवारी झालेल्या अन्य लढतींमध्ये, आसाम हॉकीने पूल डीमध्ये ली पुड्डुचेरी हॉकीचा 2-1 असा पराभव केला.

आसाम हॉकीकडून प्रियांशी सिंगने (25 आणि 33व्या मिनिटाला) दोन पेनल्टी कॉर्नरचे गोलांमध्ये रूपांतर केले.पुड्डुचेरी हॉकीकडून एकमेव गोल आर. कावियाने (24व्या मिनिटाला) केला.

पूल ईमध्ये गोवन्स हॉकी आणि हॉकी चंडिगड यांच्यातील सामना 2-2 असा बरोबरीत सुटला.

गोवन्स हॉकीसाठी उमरा (30व्या मिनिटाला) आणि मनीषा धवलने (47व्या मिनिटाला) गोल केले. हॉकी चंडिगडसाठी सिमरनजीत कौर (28व्या मिनिटाला) आणि राखीने (39व्या मिनिटाला) प्रत्येकी एका गोलची भर घातली.

रविवारी रात्री हॉकी पंजाबने हॉकी हिमाचलला 8-0 अशा मोठ्या फरकाने पराभूत केले तर मणिपूर हॉकीने हॉकी कर्नाटकवर 3-0 अशी मात केली.

निकाल (सोमवारचे सामने)
पूल-डी: आसाम हॉकी: 2(प्रियांशी सिंग 25व्या मिनिटाला-पीसी, 33व्या मिनिटाला-पीसी) विजयी वि. ली पुड्डुचेरी हॉकी: 1 (आर. काविया 24व्या मिनिटाला). हाफटाईम: 1-1

पूल-ई: गोवन्स हॉकी: 2 (उमरा 30व्या मिनिटाला – पीसी., धवल मनीषा – 47व्या मिनिटाला – पीसी) बरोबरी वि. हॉकी चंडिगड: 2 (सिमरनजीत कौर 28व्या मिनिटाला – पीसी; राखी 39व्या मिनिटाला – पीसी). हाफटाईम: 1-1

पूल-एफ: हॉकी मिझोरम: 4 (लालरिनपुई सहाव्या मिनिटाला, नवव्या मिनिटाला; एच. लालरुआतफेली 26व्या मिनिटाला – पीसी; मरीना लालरामघाकी 54व्या मिनिटाला – पीसी) विजयी वि. हॉकी पंजाब: 2(कौर तरनप्रीत 35व्या मिनिटाला – पीसी; कौर राजविंदर 51व्या मिनिटाला – पीसी). हाफटाईम: 3-0

रविवार रात्रीचे सामने:
पूल-एफ: हॉकी पंजाब:8(गुरजीत कौर पाचव्या मिनिटाला – पीसी; कौर तरनप्रीत सहाव्या, 22व्या मिनिटाला; शालू मान 22व्या मिनिटाला; प्रियांका 26व्या मिनिटाला- पीसी; देविका सेन – 33व्या मिनिटाला- पीसी; कौर राजविंदर – 35व्या मिनिटाला; देविका सेन – 41व्या मिनिटाला – पीसी. विजयी वि. हॉकी हिमाचल:0. हाफटाईम: 5-0

पूल-जी: मणिपूर हॉकी: 3(क्षेत्रिमयुम सोनिया देवी 40व्या मिनिटाला; लिली चानू मायेंगबम 55 आणि 56व्या मिनिटाला) विजयी वि. हॉकी कर्नाटक: 0. हाफटाईम:0-0.