पुणे: भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत आयोजित ‘स्वर स्नेहांकित ‘ या संगीत कार्यक्रमाला शनिवारी सायंकाळी चांगला प्रतिसाद मिळाला.
हा कार्यक्रम अबीर इव्हेन्ट या संस्थेने सादर केला.गौरी गोळे-लिमये यांनी भावसंगीत, भक्ती संगीत, नाटय संगीतातून बहारदार सादरीकरण केले. त्यांच्या गायनाला श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला.
अदिती गराडे(संवादिनी),अवधूत धायगुडे(तालवाद्य),अक्षय शेवडे(तबला) यांनी साथसंगत केली. हर्षद लिमये यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. या कार्यक्रमात मानवी आयुष्यातील नात्यांचा सुरेल शोध भावसंगीत,नाट्य संगीत आणि भक्ती संगीताच्या माध्यमातून घेतला गेला.
नाट्यसंगीतामध्ये ‘ उगवला चंद पुनवेचा ‘ ,
अभंगामध्ये ‘अबीर गुलाल उधळीत रंग ‘,
भावगीत मध्ये ‘हसले मनी चांदणे ‘, ‘कुहू कुहु येई साद’, सादर करण्यात आले.
चित्रपट गीतामध्ये ‘ आळविते केदार, ‘भरजरी ग पितांबर दिला फाडून ‘ सादर करण्यात आले. त्याचबरोबर रागमाला, चतरंग हे शास्त्रीय संगीतातील प्रकारही सादर झाले.
हा कार्यक्रम शनिवार,२३ मार्च २०२४ रोजी सायंकाळी साडे पाच सेनापती बापट रस्ता) येथे झाला.हा कार्यक्रम विनामूल्य होता.भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १९९ वा कार्यक्रम होता.भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले आणि कलाकारांचा सत्कार केला.