मुंबई, २१ मार्च २०२४: प्रामुख्याने लार्ज-कॅप स्टॉक्समध्ये (“द फंड”) गुंतवणूक करणाऱ्या एक ओपन-एंडेड इक्विटी स्कीम एचडीएफसी टॉप 100 फंडाने २०२३ मध्ये यशस्वीपणे २७ वर्षे पूर्ण केली आहेत. गेल्या २७ वर्षांत फंडाने १९% कंपाऊंड वार्षिक वाढ दर (CAGR) वितरित केले आहे. पुढे, एचडीएफसी टॉप 100 फंडामध्ये प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व्यावसायिक दिवशी (एकूण गुंतवणूक ३२.९० लाख रु.) पद्धतशीरपणे गुंतवणूक केलेली १०,००० रु. ची एसआयपी वाढवून २९ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ७.९८ कोटी रु. (शेवटी दिलेले संपूर्ण कामगिरी तपशील पहा) होऊ शकते. ही कामगिरी म्हणजे बाजारातील चढउतारांबाबत दिशादर्शन करण्याच्या आणि गुंतवणूकदारांचा विकास करण्याच्या फंडाच्या क्षमतेची पावती आहे.
पोर्टफोलिओची बांधणी टॉप डाउन सेक्टर आणि मॅक्रो ट्रेंड यांसह स्टॉक पिकिंगसाठी बॉटम अप पध्दतीचे अनुसरण करते. हा फंड GARP (वाजवी किमतीत वाढ) आणि मूल्य यांच्या मिश्रणासह वैविध्यपूर्ण शैलीचा अवलंब करतो. स्टॉक निवडीत व्यवसाय मॉडेल्सची गुणवत्ता, व्यवस्थापन आणि आर्थिक मेट्रिक्स यांवर लक्ष केंद्रित केले जाते. पोर्टफोलिओ बांधणी ही कोणत्याही वेळी उपलब्ध संधीवरील जोखीम घेण्याच्या पद्धतीवर आधारित आहे. आदेशानुसार, ८०% पेक्षा जास्त पोर्टफोलिओ नेहमी सुस्थापित लार्ज कॅप कंपन्यांमध्ये गुंतवला जातो. पोर्टफोलिओ बांधणीचा गाभा मध्यम पासून दीर्घकालीन दृष्टीकोनापर्यंत आहे. वाजवी मुल्यांकनात गुणवत्तापूर्ण कंपन्यासाठी शिस्तबद्ध दृष्टिकोन राखण्याच्या आमच्या तत्त्वज्ञानाशी धोरण सुसंगत असेल.
नियामक आणि अंतर्गत जोखीम मार्गदर्शक तत्त्वांचे पालन सुनिश्चित करत जोखीम व्यवस्थापनावर बरेच लक्ष केंद्रित केले जाते आणि सक्रिय पदे नियंत्रित केली जातात. उद्योग आणि व्यवसाय चक्रातील कंपनीच्या स्थितीचे विचारपूर्वक मूल्यांकन केल्यानंतर आणि नियमितपणे मूल्यमापन केल्यानंतर कोणतीही उच्च खात्रीशिर बेट घेतली जाते. पोर्टफोलिओ समभागांच्या संख्येत चांगले वैविध्यपूर्ण आहे आणि निधी व्यवस्थापक बेंचमार्क वि. सेक्टर डेव्हिएशन कॉल्स घेतात.
लार्ज-कॅप समभागांनी ऐतिहासिकदृष्ट्या आर्थिक चढउतारांदरम्यान स्थिरता दर्शविली आहे आणि जोखीम बक्षीस गुणोत्तर चांगले आहे. पुढे, लार्ज कॅप इंडेक्सने गेल्या १८ कॅलेंडर वर्षांपैकी ७ मध्ये मिड आणि स्मॉल कॅप निर्देशांकापेक्षा जास्त कामगिरी केली आहे. तसेच, लार्ज कॅप्सच्या तुलनेत मिड आणि स्मॉल कॅप्सची अलीकडची चांगली कामगिरी पाहता लार्ज कॅप विभाग आता मूल्यांकनाच्या दृष्टीने तुलनेने आकर्षक दिसत आहे आणि मध्यम ते दीर्घकालीन दृष्टिकोन असलेले गुंतवणूकदार एचडीएफसी टॉप 100 फंडामध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करू शकतात.
एचडीएफसी एएमसीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नवनीत मुनोत म्हणाले, “इक्विटीमध्ये संपत्ती निर्माण करण्यासाठी मजबूत गुंतवणूक + वेळ + संयम हे काळाच्या कसोटीवर उतरलेले तत्त्व आहे. एचडीएफसी टॉप 100 फंड काळाच्या कसोटीवर ठाम उभा राहिला आहे याचे कारण हेच आहे. एचडीएफसी टॉप 100 फंडाचा २७ वर्षांचा संपत्ती निर्मितीचा प्रवास हे आमच्या मजबूत संशोधन आणि गुंतवणूक प्रक्रियेचे एक चमचमते उदाहरण आहे. त्यामुळे फंडाला अनेक वर्षांतील बाजारपेठीय चक्रांचा सामना करण्यास मदत झाली आहे.
एचडीएफसी एएमसीच्या इक्विटीजचे वरिष्ठ निधी व्यवस्थापक श्री. राहुल बैजल म्हणाले,
“एचडीएफसी टॉप 100 फंडाची गेल्या २७ वर्षातील कामगिरी ही आमचे कठोर संशोधन, शिस्तबद्ध गुंतवणूक दृष्टीकोन आणि सुस्थापित व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याची पावती आहे. लार्ज कॅप स्टॉक्स दीर्घकालीन गुंतवणुकीच्या संधी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षक पर्याय बनवून स्थिरता आणि उत्तम जोखीम समायोजित परतावा देतात.”