Pune Crime : तरूणाची विचित्र धमकी; तरुणीला भेटायला बोलवलं अन् कारमध्येच…; पुण्यातील धक्कादायक घटना

By: Editor_Pratik

On: Sunday, February 11, 2024 2:42 PM

Google News
Follow Us

पुणे : पुण्यात बलात्काराच्या घटना लागोपाठ (Pune Crime News) समोर येत आहेत. त्यातच आता पुन्हा एकदा बलात्काराची घटना समोर आली आहे. तरुणीला भेटण्यासाठी बोलवलं (Pune Rape) आणि तिच्यावर स्वत:च्या कारमध्येच बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील लोणीकंद परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

Abhishek Ghosalkar Case | घोसाळकरांना मारणारा मॉरिस वारंवार अमेरिकेला का जायचा? पत्नीनेच केला मोठा खुलासा!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एकमेकांना चांगल्याने ओखळत होते. दोघांमध्ये मैत्री होती. यातून मुलाने मुलीला भेटण्यासाठी बोलवलं होतं. जर भेटायला आली नाहीस तर जीव देईल, अशी धमकी त्याने मुलीला दिली आणि भेटायला बोलवलं. त्यानंतर तिला कारमध्ये बसायला सांगितलं आणि कारमध्येच तरुणीसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. आरोपीेने तसेच याबाबत कोणाला काही सांगितले तर वडिलांना मारुन टाकण्याची धमकी दिली. तिच्या वडिलांना शिवीगाळ केली.

Crime News : अंगणवाडीत नोकरी देण्याच्या बहाण्याने 20 महिलांवर अत्याचार; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

आरोपी वारंवार धमकी देत असल्याने फिर्य़ादी यांनी त्याच्या त्रासाला कंटाळून त्याच्यासोबत बोलणे बंद केले. याचा राग आल्याने आरोपी गुरुवारी रात्री अकरा वाजता पीडित तरुणी राहत असलेल्या सोसायटीत गेला. त्याने तरुणीच्या वडीलांना शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. हा प्रकार जून 2021 ते सप्टेंबर 2023 आणि गुरुवारी (दि. 8) रात्री अकराच्या सुमारास वाघोली येथे घडला आहे. या सगळ्या प्रकरणी तरुणीने पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. यावरुन गौरव पांडूरंग बोराटे या 27 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

थरार : मित्राचा पाठलाग करून धारदार शस्त्राने डोक्यात सपासप 22 वार

काही दिवसांपूर्वी वाढदिवसाचा केक कापण्याचा बहाणा करून 15 वर्षीय मुलीला निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर दोन तरुणांनी लैंगिक अत्याचार केला होता. पुण्यातील मांजरी परिसरातील नदीपात्रात ही घटना घडली होती. या घटनेमुळे सगळीकडून संताप व्यक्त केला जात होता. याप्रकरणी तरुणीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

अंघोळ, ब्रश न करणाऱ्या पतीविरोधात महिलेची कोर्टात धाव; न्यायालयाने दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय

अनुराग साळवी आणि गणेश म्हात्रे अशी अत्याचार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी तरुण हे पीडित मुलीचे मित्र होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनुराग व गणेश यांनी मुलीला फिरायला नेतो असे सांगून फिर्यादी यांच्या सोबत गाडीवर बसून मांजरी नदीपात्राच्या झाडीत नेलं.

Poonam Pandey Death Fake News : ‘पूनम तुझी लाज वाटते! केवळ प्रसिद्धीसाठी तू…’

तिथे असलेल्या एकांताचा फायदा घेऊन अनुराग साळवी आणि गणेश म्हात्रे यांनी मुलीवर आळीपाळीने जबरदस्तीचे शारीरिक संबंध केले आणि त्यानंतर मुलीला त्या निर्जनस्थळी सोडून निघून गेले. याप्रकरणी मुलीच्या फिर्यादीवरून हडपसर पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला होता.

Husband Wife : नवऱ्याला जीवे मारण्यासाठी बायकोने केला होता खतरनाक प्लॅन, वेळीच झाली पोलखोल

BIG NEWS : जनगणनेच्या बहाण्याने घरात घुसले अन् चाकूच्या धाकाने… अमरावती हादरलं

Crime : मधुचंद्राच्या रात्री पत्नीला कळले नवरा नपुसंक, ‘माझा मुलगा कामाचा नाही..’ म्हणत सासरा बेडरुममध्ये

आधी गोळ्या झाडल्या अन् मग… पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं? घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026

March 25, 2026