BIG NEWS : जनगणनेच्या बहाण्याने घरात घुसले अन् चाकूच्या धाकाने… अमरावती हादरलं

BIG NEWS : जनगणनेच्या बहाण्याने घरात घुसले अन् चाकूच्या धाकाने… अमरावती हादरलं

BIG NEWS : सध्या राज्यभरात चोरी, लुटमार, दरोडा यांसारख्या घटना वाढत आहेत. दिवसभरात अनेक वेगवेगळ्या गुन्ह्यांच्या, चोरीच्या, दरोड्याच्या घटना समोर येत असतात. त्यातच आता आणखी एक घटना धक्कादाक अमरावतीमधून समोर आली आहे. अमरावतीमध्ये नायब तहसीलदाराच्या पत्नीला दिवसाढवळ्या लुटण्यात आले आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे जनगणनेचं काम करत असल्याचा बहाणा करून हे लुटारू आले आणि घरात घुसून चाकूचा धाक दाखवत त्यांनी सोनं-चांदीचे दागिने, कॅश यासह ५ लाखांचा मुद्देमाल लुटून फरार झाले. दिवसाढवळ्या घडलेल्या या चोरीमुळे एकच खळबळ माजली असून ते दोन्ही लुटारू सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत.

Crime : मधुचंद्राच्या रात्री पत्नीला कळले नवरा नपुसंक, ‘माझा मुलगा कामाचा नाही..’ म्हणत सासरा बेडरुममध्ये

अमरावती शहरातील राठी नगर परिसरात भरदिवसा दोन दरोडेखोरांनी नायब तहसीलदारांच्या घरात चाकूचा धाक दाखवून लूट केली. घरात एकट्या राहणाऱ्या महिलेला धमकावून चोरट्यांनी रोख रक्कमसेह लाखोंचे दागिने घेऊन पळ काढला. सरकार आणि प्रशासनाच्या वतीने जनगणना सुरू झाल्याचे सांगून हे दोन्ही बदमाश घरात घुसले होते. याबाबत माहिती गोळा करण्यासाठी आलो आहोत अशी बतावणी त्यांनी केली . ही महिला घरात एकटी असल्याचे पाहून ते घरात घुसले आणि तिला तिचे, तसेच इतर लोकांचे नाव विचारले. त्यानंतर त्यानी तिच्याकडे पाणी मागितले. महिला पाणी आणण्यासाठी आत गेली असता, संधीचा फायदा घेत दोन्ही चोरट्यांनी महिलेच्या मानेवर धारदार चाकू ठेवला.

BIG NEWS : जनगणनेच्या बहाण्याने घरात घुसले अन् चाकूच्या धाकाने… अमरावती हादरलं

Porn Star Jesse Jane : लोकप्रिय पॉर्नस्टार जेसी जेन आणि बॉयफ्रेंड Brett Hasenmueller चे निधन; राहत्या घरात आढळले मृतावस्थेत, ड्रग ओव्हरडोज झाल्याचा संशय

राठी नगर परिसरात नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या पत्नी घरात एकट्याच होत्या. तेव्हा दोघे जण जनगणनेचं काम करण्याच्या बहाण्याने आले. नाव, माहिती विचारू लागले. नंतर त्यांनी महिलेकडे पिण्यास पाणी मागितले आणि ती एकटी असल्याचे पाहून तिच्या मानेवर चाकू ठेवत धमकी दिली. घरात जेवढी कॅश, सोन-चांदीचे दागिने असतील ते काढून दे. तसं केलं नाही तर हा चाकू तुमच्या मानेवर चालवू असेही त्यांना धमकावले. घाबरलेल्या महिलेने सोन्याचे दागिने, तसेच कॅश यासह 5 लाखांचा मुद्देमाल चोरांच्या हवाली केला. त्यानंतर त्या लुटारूंनी धक्का देऊन महिलेला खाली पाडले आणि ते तेथून फरार झाले. महिलेने प्रसंगावधान राखत आरडा-ओरडा केला, तिचा आवाज ऐकून शेजारचे धावत आले असता, त्या महिलेने सर्व प्रकार कथन केला.

BIG NEWS : जनगणनेच्या बहाण्याने घरात घुसले अन् चाकूच्या धाकाने… अमरावती हादरलं

Crime News :‘त्या’ खुनाचा 12 तासांत उलगडा; मित्राच्या मदतीने पतीचा घात

त्या महिलेला धक्का देऊन घराबाहेर पळून जाताना ते दोन्ही चोरटे तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तपास सुरू केला. सरकारी अधिकाऱ्याच्या घरात अशी घटना घडणे ही पोलिस व प्रशासनासाठी गंभीर बाब आहे. याप्रकरणी पोलिसांनी वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.