HDFC Ergo : एचडीएफसी अर्गो तर्फे ग्राहकांच्या जीवनाला सोपे करण्यासाठी हियर ॲप मध्ये नाविन्यपूर्ण अपग्रेड्स

पुणे : भारतातील आघाडीच्या खाजगी जनरल इन्शुरन्स कंपनी एचडीएफसी अर्गो (HDFC Ergo) जनरल इन्शुरन्स तर्फे आपल्या ग्राहकांचा अनुभव अधिक समृध्द करण्यासाठी त्यांच्या हिअर ॲप मध्ये काही अनोख्या इन्शुरन्स वर आधारीत इकोसिस्टमचे अपग्रेड्स आणल्या आहेत.

भारत हा देश सर्वाधिक मधुमेही रुग्णांच्या संख्येने युक्त देशांपैकी एक असून १०० दशलक्षाहून अधिक भारतीयांना मधुमेह आहे आणि १३६ दशलक्ष लोक हे प्री डायबेटिक आहेत. पुढील काही वर्षांत ही आकडेवारी वाढण्याची शक्यता आहे. सर्वसमावेशक आरोग्य देणारी एक संस्था असलेल्या एचडीएफसी अर्गोच्या हिअर ॲप मध्ये आता डायबेटिस सीओई वैशिष्ट्य सुरु करण्यात आले असून हे वैशिष्ट्य फिटरलीच्या सहकार्याने सुरु करण्यात आले आहे, या माध्यमातून वापरकर्त्यांना मधुमेह व्यवस्थापनाची तंत्र उपलब्ध करण्या बरोबरच वैयक्तिक हेल्थ आणि वेलनेस प्रोग्राम्स उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. यामुळे आता ग्राहकांना कमी आरोग्य खर्चात अधिक चांगले आरोग्य उपाय उपलब्ध होणार आहेत.

ॲप वापरकर्त्यांना पर्सनलाईज्ड डाएट प्लान्स, व्यायामाचे रुटीन्स, औषधांची रिमाइंडर्स आणि टेलर्ड मॉनिटरींग जसे प्रत्येकाची हेल्थ प्रोफाईल, लाईफस्टाईल आणि प्राधान्य तपासले जाणार आहेत. त्याच बरोबर सीओई च्या माध्यमातून रुग्णासाठी सल्लामसलतीसह शैक्षणिक मटेरियल उपलब्ध करुन रुग्णांचे आरोग्य सुधारुन ते योग्य निर्णय घेऊ शकतील. वापरकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्यासाठी विशेष पॉलिसीज आणि इंटरव्हेन्शन्स तयार केली जातील.

ॲपमध्ये जोडण्यात आलेले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पेट इकोसिस्टम होय, यामध्ये वापरकर्त्यांना त्यांच्या पेटच्या गरजा ओळखून पशूवैद्यकां बरोबर संपर्क करणे आणि पेटच्या अन्य पालकांबरोबर जोडणे शक्य होईल.

हियर ॲप मधील दोन वैशिष्ट्यां विषयी बोलतांना एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स च्या रिटेल बिझनेस चे अध्यक्ष पार्थनील घोष यांनी सांगितले “ आमची संस्था ग्राहकांच्या अनुभवावर लक्ष केंद्रित करणारी आहे आणि आम्ही सातत्याने आमच्या उत्पादनांसह सेवांमध्ये सुधारणा करुन ग्राहकांच्या सातत्याने बदलणार्‍या गरजा पूर्ण करत असतो. २०२३ मध्ये सुरु करण्यात आलेले आमचे हियर ॲप म्हणजे भारतातील पहिली विम्यावर आधारीत इकोसिस्टम आहे, या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला असून ४० लाखांहून अधिक डाऊनलोड्स झाले आहेत, आमचा संरचनात्मक, माहितीवर आधारीत दृष्टिकोन हा सोपेपणा, त्रासविरहीत आणि बचत करणे या खांबांवर आधारीत आहे. ही योजना आमच्या ‘सिरीयसली हेल्पफूल’ होण्याच्या वचनबध्दतेनुसार असून आमच्या ग्राहकांच्या गरजेच्या वेळी आम्ही त्यांच्या कामी येतो.”

जून २०२३ मध्ये सुरु करण्यात आलेले हियर ॲप आता ग्राहकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला असून सातत्याने जोडणी आणि पुन्हा भेट देण्याचे प्रमाण अधिक आहे. या मंचाचे वैशिष्ट्य म्हणजे हा अनोखा पेशंट टू पेशंट मंच असून यामध्ये कोणतीही व्यक्ती अन्य स्वयंसेवकांशी जोडली राहू शकते विशेषकरुन त्यांच्या प्रमाणेच वैद्यकीय उपचार घेतलेल्या व्यक्तीं बरोबर जोडली राहते.