Redmi A3 in India : पुणे : जागतिक स्तरावरील आघडीच्या शाओमी तर्फे त्यांच्या ए मालिकेतील नवीनतम स्मार्टफोन,रेडमी ए ३ बाजरात दाखल करण्यात आला आहे. सदरील रेडमी ए ३ आता भारतात रु. ६,999 या सुरुवातीच्या किंमतीमध्ये उपलब्ध झाला आहे. रेडमी ए ३च्या केंद्रस्थानी त्याचे प्रीमियम हॅलो डिझाईन आहे, ज्यामध्ये ग्लास फिनिशचे दोन उत्कृष्ट पर्याय आणि एक विलासी लेदर-टेक्श्चर मटेरियल आहे, जे केवळ अत्याधुनिकच वाटत नाही, तर हाताला देखील आलिशान वाटते. डिझाईन आणि मटेरिअलचे निर्बाध एकत्रीकरण या स्मार्टफोनला एक वेगळी ओळख प्राप्त करून देते, ज्यामुळे तो एक झटपट स्टाईल स्टेटमेंट बनला आहे.
रेडमी ए ३ मध्ये १७.०४ सेंमी एलसिडी डॉट ड्रॉप डिस्प्ले आणि १६५० x ७२० रिझोल्यूशन असून, या स्मार्टफोनमध्ये असाधारण ९० हर्टज रिफ्रेश रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास३ संरक्षण आहे. वापरकर्ते अतुलनीय स्पष्टतेसह चैतन्यपूर्ण व्हिज्युअल्समध्ये देखील तल्लीन होऊ शकतात. या डिव्हाइसमध्ये डीसी डिमिंग तंत्रज्ञान समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामुळे प्रकाशाच्या कोणत्याही स्थितीत पाहण्याचा आरामदायी अनुभव सुनिश्चित केला जातो.
हा स्मार्टफोन, २. २ जी हर्टज च्या सर्वोच्च गतीसह मजबूत मीडिया टेक हेलिओ जी ३६ एसओसी सह येतो, जेणेकरून रेडमी ए ३ एक अशी चमकदार-जलद कामगिरी प्रदान करतो, ज्यामुळे मल्टीटास्किंग एक अतिशय सोपे काम बनते. शिवाय,१२ जीबी पर्यंत रॅम सह आणि ६ जीबी पर्यंत व्हर्च्युअल रॅम आणि १२८ जीबी पर्यंतच्या विस्तृत स्टोरेज क्षमतेसह, वापरकर्ते ॲपच्या निर्बाध लाँचचा आणि डेटाच्या जलद ट्रान्सफरचा आनंद घेऊ शकतात. अँड्रॉइड १४ द्वारे संचालित या स्मार्टफोनमध्ये एक सुव्यवस्थित अँड्रॉइड इंटरफेस आहे, जे वापरकर्त्यासाठी एक सुव्यवस्थित अनुभव प्रदान करून, गती आणि कार्यक्षमतेला महत्व देते.
रेडमी ए ३सुरक्षित साइड फिंगरप्रिंट वैशिष्ट्यासह सुसज्ज आहे आणि तो, सौंदर्यशास्त्र आणि सोय या दोन्हीं गोष्टींना प्राधान्य देतो.
रेडमी ए ३ मध्ये असे ८ एमपी एआय ड्युअल-कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये एआय पोर्ट्रेट मोड, एचडीआर आणि गुगल लेन्स इंटिग्रेशन यासह अनेक वैशिष्ट्यांचा समावेश आहे. एक आश्चर्यकारक१०८० पी रिझोल्यूशनसह आणि त्याच्या टाइम-लॅप्स वैशिष्ट्यासह तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये देखील उत्कृष्ट कामगिरी करू शकता. फ्रंट/सेल्फी कॅमेरा५ एमपी सह येतो आणि विविध परिस्थितींमध्ये तपशीलवार शॉट्सची खात्री देतो. ए आय पोर्ट्रेट मोड आणि डेप्थ कंट्रोलसह, वापरकर्ते, आकर्षक पोर्ट्रेट टिपू शकतात आणि एआय ब्युटिफायसह त्यांच्या सेल्फीमध्ये अधिक सुधारणा करू शकतात, ज्यामुळे प्रत्येक शॉटमध्ये सेल्फी नेहमीच सर्वोत्तम दिसतील या बाबीची खात्री केली जाते.
रेडमी ए ३ ची बॅटरी मोठ्या ५००० एमएएच आणि चार्जिंगच्या १० वॉट जलद क्षमतेसह येते आणि दीर्घकाळ टिकणारी कामगिरी आणि वापर या बाबींची खात्री देते. रेडमी ए ३ ची किंमत हा एक असा आकर्षक स्मार्टफोन आहे ज्यामध्ये प्रीमियम डिझाइन, कामगिरीची गुणवत्ता आणि वापरकर्ता अनुभव आहे. स्मार्टफोनच्या हॅलो डिझाइनमुळे तो सेगमेंटमध्ये एक ओघवता आणि आश्चर्यकारक फोन बनला आहे. हे असंख्य रोमांचक वैशिष्ट्यांनी भरलेले एक असे संपूर्ण पॅकेज आहे, जे विद्यार्थी आणि नवीन नोकरदारांसाठी एक उत्कृष्ट पर्याय बनले आहे.
रेडमी ए ३ ३ + ६४ जीबी ची मूळ किंमत रु,९,९९९ असून २९ फेब्रुवारी पर्यंत ह्या डीव्हायसची किंमत ६,९९९ रुपये आहे. ४+ १२८ जीबी ची मूळ किंमत रु. १०,९९९ रुपये असून २९ फेब्रुवारी पर्यंत ह्या डीव्हायसची किंमत रुपये ७,९९९ आहे. तसेच ६ + १२८ जीबी ची मूळ किंमत रु. ११, ९९९ रु. असून २९ फेब्रुवारी पर्यंत ह्या डीव्हायसची किंमत रु. ८,९९९ रुपये आहे. रेडमी ए ३ एमआय डॉट कॉम, अमेझॉन डॉट इन , फ्लिपकार्ट , एमआय होम्स वर आणि इतर शाओमी रिटेल भागीदारांच्या येथे, २३ फेब्रुवारी २०२४ पासून ऑलिव्ह ग्रीन, लेक ब्लू, मिडनाईट ब्लॅकमध्ये उपलब्ध होईल. ग्राहक २३ ते २९ फेब्रुवारी २०२४ पासून रु. ६,९९९ पासून सुरु होणाऱ्या विशेष प्रास्ताविक किंमतीवररेडमी ए ३ खरेदी करू शकतात. प्रास्ताविक किंमतीमध्ये रु. ३०० चा एक्सचेंज बोनस देखील समाविष्ट आहे.