Husband Wife : नवऱ्याला जीवे मारण्यासाठी बायकोने केला होता खतरनाक प्लॅन, वेळीच झाली पोलखोल

अमेरिकेत राहणाऱ्या एका व्यक्तीच्या पायाखालची जमिनच सरकली जेव्हा त्याला समजलं की, त्याची पत्नीच (Husband Wife)त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे. पतीला पत्नीच्या या धक्कादायक प्लॅनबाबत तेव्हा समजलं जेव्हा तो सतत वजन कमी होत असल्याने डॉक्टरकडे गेला होता. डॉक्टरने सांगितलं की, त्याला प्रोटीन पावडरमध्य आर्सेनिक(विष) दिलं जात आहे.

BIG NEWS : जनगणनेच्या बहाण्याने घरात घुसले अन् चाकूच्या धाकाने… अमरावती हादरलं

‘डेली मेल की रिपोर्टनुसार, अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना येथे राहणारे जेडी मॅककेबे यांनी हा प्रकार समोर आल्यावर आपल्या पत्नीला घटस्फोट दिला. मॅककेबे यांनी सांगितलं की, त्यांची घटस्फोटीत पत्नी त्यांना प्रोटीन पावडरमध्ये आर्सेनिक मिक्स करून देत होती. ज्यामुळे काही महिन्यातच त्यांचं वजन ३० किलो कमी झालं होतं. इतकंच नाही तर त्यांना आतड्या आणि सांधेदुखीची समस्याही होऊ लागली होती.

Crime : मधुचंद्राच्या रात्री पत्नीला कळले नवरा नपुसंक, ‘माझा मुलगा कामाचा नाही..’ म्हणत सासरा बेडरुममध्ये

मॅककेबे इतके कमजोर झाले होते की, लोक त्यांना कॅन्सर पेशंट समजू लागले होते. मॅककेबे म्हणाले की, त्यांनी एरिनसोबत लग्न करून १७ वर्ष आनंदाने जगले. पण अचानक एरिनने त्यांच्यावर फसवणूक, ड्रग्स, दारूचं अत्याधिक सेवन करणे आणि मानसिक रूपाने आजारी असल्याचा आरोप करणं सुरू केलं होतं. मॅककेबे यांना यापेक्षा झटका तेव्हा लागला जेव्हा त्यांना समजलं की, त्यांची तब्येत बिघडण्यामागे त्यांची पत्नीच आहे.

अनेक डॉक्टरांकडून सल्ला घेतल्यावर मॅककेबे यांना समजलं की, ते बऱ्याच काळापासून आर्सेनिक घेत आहेत. जे त्यांना प्रोटीन पावडरमध्ये टाकून दिलं जात होतं. ते म्हणाले की, त्यांची घटस्फोटीत पत्नीच त्यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न करत होती.

आधी गोळ्या झाडल्या अन् मग… पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं? घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर

आर्सेनिक एक असा विषारी पदार्थ आहे जो कुणाचाही जीव घेऊ शकतो. अशात मॅककेबे यांच्या प्रोटीन पावडरमद्ये आर्सेनिक मिश्रित करणं त्यांच्यासाठी स्लो पॉयजनचं काम करत होतं. मात्र, सुदैवाने वेळीच त्यांना हे समजलं आणि त्यांचा जीव वाचला.