Poonam Pandey Death Fake News : ‘पूनम तुझी लाज वाटते! केवळ प्रसिद्धीसाठी तू…’

Poonam pandey Death Fake News Vivek Agnihotri : मनोरंजन विश्वातील सेलिब्रेटी पूनम पांडे ही तिच्या अगोदर तिच्या निधनाच्या बातमीमुळे चर्चेत आली होती. तर आता ती तिच्या जिवंत असण्याच्या व्हिडिओमुळे नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचे कारण ठरताना दिसत आहेत. अशातच पूनम पांडेवर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

Husband Wife : नवऱ्याला जीवे मारण्यासाठी बायकोने केला होता खतरनाक प्लॅन, वेळीच झाली पोलखोल

पूनम पांडेचे निधन झाल्यानंतर तिच्या चाहत्यांना धक्का बसला होता. मात्र काही जणांनी सोशल मीडियावरुन तिच्या निधनाच्या बातम्यांविषयी शंका घेण्यास सुरुवात केली होती. त्याचे कारण म्हणजे यापूर्वी देखील पूनमनं प्रसिद्धीच्या नावाखाली वाट्टेल ते व्हिडिओ व्हायरल केले होते. कोणत्याही पातळीवर जाऊन लोकप्रियता मिळवण्याचा अट्टाहास पूनमनं नेहमीच धरला आणि तिला नेटकऱ्यांचा प्रतिसादही मिळाला.

BIG NEWS : जनगणनेच्या बहाण्याने घरात घुसले अन् चाकूच्या धाकाने… अमरावती हादरलं

यावेळी पूनमनं कहर केला. गर्भाशयाच्या कॅन्सरचे निमित्त सांगून तिचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आणि एकच खळबळ उडाली. काल दिवसभर सोशल मीडियावर पूनम पांडे ही चर्चेत होती. तिचा मृत्यू नेमका कसा झाला, ती खरच आजारी होती का, अशा वेगवेगळ्या चर्चा यावेळी समोर आल्या होत्या या प्रकरणावर मात्र टीव्ही मनोरंजन आणि बॉलीवूडमधील नामवंत सेलिब्रेटींनी नाराजी व्यक्त केली आहे.

Crime : मधुचंद्राच्या रात्री पत्नीला कळले नवरा नपुसंक, ‘माझा मुलगा कामाचा नाही..’ म्हणत सासरा बेडरुममध्ये

काश्मिर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी तीव्र शब्दांत त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. प्रसिद्धीच्या नावाखाली अशा प्रकारचे गिमिक्स करणे हे खूपच वाईट आहे. माध्यमांनी देखील या गोष्टीचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. मला असे वाटते फेक डेथ न्यूज ही आता कुठे सुरुवात आहे. आगे आगे देखो होता है क्या….अशा शब्दांत अग्निहोत्री यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.

आधी गोळ्या झाडल्या अन् मग… पोलीस स्टेशनमध्ये नेमकं काय घडलं? घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर

दुसरीकडे बिग बॉसमधील प्रसिद्ध सेलिब्रेटी अली गोनीनं तर आगपाखड केली आहे. त्यानं तर पूनम मला तुझी लाज वाटते.तू जे काही केले ते खूप चूकीचे म्हणावे लागेल. प्रसिद्धीच्या नावाखाली आपण काय करतो आहे हे कळायला नको का, हा फक्त पब्लिसिटी स्टंट होता…आणि त्यामागे तुझी पूर्ण टीम देखील होती. याला काय म्हणावे….अशा शब्दांत अली गोनीनं त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यापूर्वी पूनमच्या निधनाचे वृत्त ऐकून अभिनेत्री कंगना आणि अनुपम खेर यांनी पोस्ट देखील केली होती. मात्र आता त्यांना ती पोस्ट डिलिट करावी लागली आहे. यामुळे त्यांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. अभिनेत्री रिद्धी डोगरानं तिच्या भावना तीव्र शब्दांत मांडल्या आहेत. ती म्हणते, भलेही काही जणांना त्या आयडियाचे फार कौतुक वाटत असेल मात्र तसे नाही.

आपण कोणत्या थराला जात आहोत काय करत आहोत याचे भान आपल्याला राहिलेलं नाही. लोकप्रियतेच्या हव्यासापोटी काहीही करण्यात अर्थ नाही. अशा शब्दांत रिद्धीनं प्रतिक्रिया दिली आहे. राखीनं तर खास व्हिडिओ शेयर करुन पूनमला खडसावले आहे. ती म्हणते, तू काय केलं तुला तरी माहिती आहे का, मी तुझ्या निधनाची बातमी ऐकून खूपच धक्क्यात गेले होते. तुझ्यासाठी पोस्ट देखील शेयर करणार होते. तू काय करुन बसलीस…

पूनम तू वेडी आहेस का, केवळ प्रसिद्धीच्या नावाखाली आपण काय करतो आहोत याचे जराही भान तू ठेवले नाहीस, मला तर तुझे वागणे अजिबात आवडलेलं नाही. अशा शब्दांत राखीनं तिचा राग व्यक्त केला आहे. याबरोबरच प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी देखील पूनमच्या निधनाच्या वक्तव्यावर पोस्ट शेयर केली आहे.