लोणी काळभोर (सचिन सुंबे) : ड्रीम्स युवा सोशल फाउंडेशन संचलित उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या ९ व्या वर्धापनदिनानिमित्ताने भव्य दिव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी बी जे मेडिकल ससून व तर्पण ब्लड बँक यांची मदत झाली. LONIKALBHOR
उरुळी कांचन ग्राम स्वच्छता अभियान ग्रुप पर्यावरण स्वच्छता व आरोग्य या विषयावर मागील ८ वर्षांपासून सातत्याने काम करत आहे .या वेळी के डी बापू कांचन ,राजाराम कांचन ,संभाजी कांचन ,महादेव कांचन,सरपंच भाऊसाहेब कांचन ,माजी सरपंच संतोष हरिभाऊ कांचन, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष कांचन ,भाऊसाहेब तुपे, टिळेकरवाडीचे सरपंच सुभाष लोणकर ,कोरेगाव मुळचे सरपंच मंगेश कानकाटे , रामभाऊ तुपे, सुनील तांबे ,जयप्रकाश बेंद्रे पोलीस पाटील विजय टिळेकर ,चंद्रकांत टिळेकर ,माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कसबे व पत्रकार उपस्थित होते.
यावेळी पोलीस पाटील यांनी रक्तदान केले . या रक्तदान शिबिरासाठी जिल्हा परिषद पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ रमेश चव्हाण यांनी वेळेत वेळ काढून शिबिराला भेट दिली. ग्रामस्वच्छता अभियानाच्या कामाचे कौतुक केले तसेच लोकसहभागातून ग्रामविकास कशा पद्धतीने घडू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ग्रामस्वच्छता अभियान ग्रुप आहे.
तसेच गावाच्या विकासासाठी कचरा व्यवस्थापन ह्या संदर्भात आपण एकत्रित काम करू तसेच आवश्यक साधनसामग्री आपणास उपलब्ध करून दिली जाईल असे आश्वासन दिले .या शिबीरामध्ये ८६५ , रक्तदात्यांनी रक्तदान केले. त्यामध्ये ८३९पुरूष व २६ महीलांचा समावेश आहे. या शिबिराम शिबिराला पुर्व हवेलीतील अनेक गावांतील नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देऊन रक्तदान केले.
तुम्ही या बातम्या वाचल्यात का?
मोठी बातमी : ऑनलाइन गर्लफ्रेंड स्कीमचा पर्दाफाश; राज्य हादरलं
Brother want Marry Sister : बहिणीशीच लग्न करण्याचा भावाचा बालहट्ट, विरोध केल्याने उचललं भयानक पाऊल
Big News Sharad Mohol | मुन्ना पोळेकर फक्त मोहरा, खरा मास्टर माईंड समोर
WhatsApp वर करा गॅसचे बुकिंग, कसे करायचे बुकिंग, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस
Sharad mohol murder case : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील आरोपी वकिल ढसाढसा रडले, कारण…