WhatsApp वर करा गॅसचे बुकिंग, कसे करायचे बुकिंग, जाणून घ्या पूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली | व्हॉट्सअप (WhatsApp) आता चॅटिगपुरते मर्यादीत राहिलेले नाही. चॅटिंगसह इतर अनेक कामं आता व्हॉट्सअपच्या मदतीने करता येतात. अनेक बँका आता व्हॉट्सअपवर मर्यादीत बँकिंग सोयी-सुविधा पुरवत आहेत. इतकेच नाही तर तुम्हाला गॅसचे बुकिंगसुद्धा व्हॉट्सअपवर करता येईल.

Big News Sharad Mohol | मुन्ना पोळेकर फक्त मोहरा, खरा मास्टर माईंड समोर

अनेक गॅस रिफलिंग कंपन्यांनी ही सेवा सुरु केली आहे. भारतात कोट्यवधी लोक व्हॉट्सअपचा वापर करतात. अनेक कंपन्या त्यांचा सेवा व्हॉट्सअपद्वारे पुरवितात. यामध्ये गॅस बुकिंगची सेवा पण सुरु झाली आहे.

अनेक जण मोबाईलवरुन बुकिंगसाठी एजन्सीला कॉल करतात. एकतर समोरील व्यक्ती फोन उचलत नाही अथवा ही लाईन बिझी येते. काहीजण एजन्सीच्या कार्यालयात जातात. तिथे बुकिंगसाठी पण रांग असते. आता हा मनस्ताप कमी होणार आहे. तुम्हाला व्हॉट्सअपवर गॅस बुकिंग करता येईल. त्यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवरुन गॅस बुकिंगसाठी तुमच्या कंपनीच्या क्रमांकावर संपर्क करावा लागेल. त्यावर मॅसेज पाठवावा लागेल.

BIG NEWS : सावलीनेच केला घात; शरद मोहोळ प्रकरणातील मुख्य आरोपी पोलिसांच्या ताब्यात, शस्रही जप्त; १५ गुन्ह्यांमध्ये अट्टल गुन्हेगार

WhatsApp Gas booking

या क्रमांकावर पाठवा मॅसेज : देशातील गॅस रिफिलिंग कंपन्या पण व्हॉट्सअपवर सेवा देत आहेत. तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरुन तुम्हाला त्यांच्या व्हॉट्सअपवर मॅसेज पाठवावा लागेल. त्यासाठी HP GAS- 9222201122, Indane- 7588888824 आणि Bharat Gas-1800224344 हा क्रमांक सेव्ह करा. त्यावर मॅसेज पाठवून पुढील प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्यानुसार गॅस बुकिंग करता येईल.

Bengaluru Shocker : पत्नीला खासगी फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याची धमकी, आरोपी पतीला अटक, बेगंळुरू येथील घटना

असे करा बुकिंग : तुमच्या गॅस कंपनीचा क्रमांक सेव्ह करा. व्हॉट्सअपवर जाऊन HI लिहा. त्यानंतर तुमची भाषा निवडा. यानंतर व्हॉट्सअपवरच तुम्हाला गॅस बुकिंग, नवीन कनेक्शन, एखादी तक्रार हे सर्व पर्याय येथेच उपलब्ध होतील. त्यातील तुमचा पर्याय निवडा.

Sharad Mohol | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळचं भाजपाशी कनेक्शन?

गॅसचे बुकिंग करायचे असेल तर लगेचच हा पर्याय निवडता येईल. रिफिल बुक केल्यानंतर स्थानिक सेवेनुसार तुमच्या घरी गॅस येईल. पण ही सेवा घेण्यासाठी तुमचा मोबाईल क्रमांक संबंधित कंपनीकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. सध्या ई-केवायसी करणे पण आवश्यक आहे. एजन्सीवर जाऊन ते पूर्ण करता येईल.

Big News Sharad Mohol : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार, उपचारादरम्यान मृत्यू, कोथरुडमध्ये घडला थरार