तरुणाचा खासगी भाग महिलेने कापला; चौकशी सुरू; पहा Video

उत्तर प्रदेशातील ललितपूरच्या अर्जुन खिरिया गावात एका तरुणावर एका महिलेसह व्यक्तींच्या गटाने क्रूरपणे हल्ला केला. (Video)

या टोळक्याने धारदार शस्त्राने त्या व्यक्तीचा प्रायव्हेट पार्ट कापला. पीडित आणि आरोपी दोघेही मजूर असून ते नुकतेच राजस्थानहून आले होते. पीडितेच्या घरी पहाटे चारच्या सुमारास हा हल्ला झाला. या भीषण हल्ल्यामागील हेतू अद्याप अस्पष्ट आहे.

या घटनेनंतर पीडितेला त्याच्या नातेवाईकांनी स्थानिक रुग्णालयात दाखल केले. पीडिताची ओळख गुप्त ठेवण्यात आली असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. झाशीचे पोलीस उपमहानिरीक्षक यांनी ललितपूर पोलीस ठाण्याला या घटनेबाबत आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.