iPhone सारखा फोन मिळवा स्वस्तात, फीचर्सवर पहाल तर व्हाल एकदम फिदा

अनेकांना आयफोन (iPhone) हवा असतो. पण आयफोनचे बजेट अनेकांच्या आवाक्याबाहेर आहे. आयफोन खरेदीसाठी जादा रक्कम मोजावी लागते. पण कमी किंमतीत आयफोन सारखा एक स्मार्टफोन तुम्हाला खरेदी करता येतो. हा स्मार्टफोन दिसायला अगदी आयफोनसारखाच आहे. त्यातील काही फीचर्स आणि कॅमेरा पण दमदार आहे. या स्मार्टफोनची बाजारात एकच चर्चा आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनसाठी तुम्हाला 40-50 हजार रुपये खर्च येणार नाही. तर 5 हजार रुपयांपेक्षा पण कमी किंमतीत तुम्ही हा स्मार्टफोन खरेदी करु शकतात.

JioFi Jio Phone

जिओचा हा स्मार्टफोन तुम्हाला फायद्याचा ठरेल. या फोनची मूळ किंमत 7,299 रुपये आहे. पण तुम्हाला हा मोबाईल एमेझॉनवर 33 टक्के सवलतीसह खरेदी करता येईल. हा स्मार्टफोन ग्राहकाला 4,900 रुपयांत खरेदी करता येईल. या फोनमध्ये ग्राहकाला 3500 mah बॅटरी मिळते. तसेच 2GB RAM, 32 GB ROM स्टोरेज मिळेल.

SHIVANSH Flame 2

एमेझॉनवर हा स्मार्टफोन ग्राहकांना 44 टक्के डिस्काऊंटसह केवळ 2,790 रुपयांमध्ये मिळत आहे. हा स्मार्टफोन क्लासी ब्लॅक कलरमध्ये मिळतो. हा स्मार्टफोन अनेकांना पसंत पडू शकतो, ते त्याच्या खास डिझाईनमुळे. अनेक ग्राहकांना काळा रंग आवडतो.

आयफोनसारखा IKALL K510 स्मार्टफोन

IKALL K510 या स्मार्टफोनची सध्या चर्चा रंगली आहे. या स्मार्टफोनची मूळ किंमत 9,999 रुपये आहे. पण हा स्मार्टफोन तुम्ही 52 टक्के डिस्काऊंटसह तुम्ही खरेदी करु शकता. सवलतीत हा स्मार्टफोन तुम्हाला 4,799 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. हा फोन एकदम आयफोनसारखा दिसतो.

SHIVANSH YUTOPIA

या स्मार्टफोनची मूळ किंमत 29,999 रुपये आहे. पण त्यावर 84 टक्क्यांची भलीमोठी सवलत देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन ग्राहकांना केवळ 4,790 रुपयांना खरेदी करता येईल. हा फोन स्टोरेजसाठी पण जोरदार आहे. यामध्ये ग्राहकांना 4 GB RAM & 32 GB ROM मिळतो. व्हिडिओ आणि फोटोसाठी या फोनमध्ये 21 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.

LYF Flame 5 4G

LYF Flame 5 4G हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची संधी आहे. त्यावर 42 टक्के सवलत आहे. हा स्मार्टफोन केवळ 2,899 रुपयांना मिळत आहे. या स्मार्टफोनवर अनेक फीचर आहे. हा फोन बेसिक असला तरी कमी किंमतीत चांगले फीचर मिळतात. हे सर्व बजेट फोन आहेत.