Nagpur Blackmailing Crime : मित्राच्या बायकोसोबत आधी जुळलं सूत अन् नंतर संपत्ती मिळवण्यासाठी व्हायरल केले व्हिडीओ

Nagpur Blackmailing Crime : नवऱ्याला सोडून प्रेयसीने आपल्याशी लग्न करावे यासाठी प्रियकरानेच तिचे अश्‍लिल व्हिडिओ नातेवाईक आणि संबंधितांना पाठवून बदनामी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी प्रियकराला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली.

BIG NEWS PETROL PUMP : पेट्रोल पंप पुन्हा बंद राहणार? जाणून घ्या सर्व काही…

धीरज बाजीराव इंदुरीकर (वय ४३, रा. हावरापेठ, भगवाननगर) असे आरोपीचे नाव आहे. सध्या तो बेरोजगार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेलतरोडी परिसरात राहणाऱ्या महिलेचा पती आणि धीरज हे जूने मित्र आहेत.

CCTV FOOTAGE : मॅडम, 15 देत आहे, ठेवून घ्या ना… सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्व काही कैद; काय घडलं?

त्यामुळे धीरजचे त्याच्या घरी नेहमीच येणे-जाणे होते. धीरजच्या मित्राचे २००९ मध्ये लग्न झाले. मित्राकडे नेहमीच जाणे येणे असल्याने त्याच्या पत्नीशी धीरजचा परिचय झाला आणि २०१५ मध्ये या विवाहितेचे धीरजसोबत सुतही जुळले. यातून त्यांनी अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

Sharad Mohol : संदीप मोहोळच्या हत्येनंतर शरद मोहोळने वैकुंठातच घेतली होती ‘अशी’ शपथ; तपासात अनेक गोष्टी उघड

या काळात धीरजने महिलेचे अश्‍लिल फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड करून ठेवले होते. धीरजचा महिलेच्या संपत्तीवर डोळा असल्याने त्याला तिच्याशी संसार थाटायचा होता. मात्र त्याला महिलेने नकार दिल्याने धीरजने त्याच्याकडील व्हिडिओ आणि अश्‍लिल फोटो नातेवाईक, कंपनीतील कर्मचाऱ्यांना कुरिअरच्या माध्यमातून पाठविले.

Sharad Mohol : तेव्हापासून आरोपी धुमसतच होते… शरद मोहोळ हत्याप्रकरणातील सर्वात धक्कादायक माहिती उघड