BIG NEWS PETROL PUMP : पेट्रोल पंप पुन्हा बंद राहणार? जाणून घ्या सर्व काही…

BIG NEWS PETROL PUMP : राज्यातील वाहन चालकांनी पुन्हा एकदा संप पुकारला आहे, अशी बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच छत्रपती संभाजीनगरातील पेट्रोल पंपांवर नागरिकांनी मोठी गर्दी केली. मात्र, याबाबत चालक संघटनांनी अद्याप माहिती दिली नसल्याचे छत्रपती संभाजीनगर पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास यांनी सांगितले.

CCTV FOOTAGE : मॅडम, 15 देत आहे, ठेवून घ्या ना… सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्व काही कैद; काय घडलं?

दुसरीकडे येत्या 9 जानेवारीपासून रात्री बारानंतर अवजड वाहन चालक संपावर जाणार असल्याची माहिती जय संघर्ष वाहन-चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय हळनोर यांनी दिली. मात्र, राज्यातील इतर चालक संघटना यामध्ये सहभागी होणार आहेत का नाही याबाबात संभ्रम आहे.

Sharad Mohol : संदीप मोहोळच्या हत्येनंतर शरद मोहोळने वैकुंठातच घेतली होती ‘अशी’ शपथ; तपासात अनेक गोष्टी उघड

ट्रक, टँकरचालक रात्रीपासून पुन्हा संपावर जाणार या भीतीने सोमवारी छत्रपती संभाजीनगरमधील पेट्रोलपंपावर सकाळपासूनच शहरवासीयांनी रांगा लावल्या. सेव्हन हिल्स् परिसरातील पेट्रोल पंपावर तर गजानन महाराज रोडवरूनच रांगा लागल्या. रोडवर आणि पेट्रोल पंप परिसरात प्रचंड गर्दी झाली. येणारे-जाणारे वाहनधारक थांबवून विचारणा करत. त्यातील अनेक जण संप होणार म्हटल्यावर रांगेत लागत. विशेष म्हणजे यावेळी ट्रॅक्टर चालक ट्रॉलीसह रांगेत उभे राहिले. त्यामुळे गर्दी जास्त तुंबली. यातल्या बहुतांश जणांनी आपल्या गाड्याच्या टाक्या फुल्ल करून घेतल्या. छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोड, गारखेडा परिसर, बीड बायपास, सिडको या भागातल्या अनेक पंपावर अशीच गर्दी होती.

Sharad Mohol : तेव्हापासून आरोपी धुमसतच होते… शरद मोहोळ हत्याप्रकरणातील सर्वात धक्कादायक माहिती उघड

पंपावर पेट्रोल भरण्यासाठी गर्दी करणाऱ्या अनेकांनी ऑनलाइन पैसे द्यायला प्राधान्य दिले. त्यात कोणाचे कार्ड पेमेंट, तर कोणाचे फोन अथवा गुगल पे. पंपावरील कर्मचाऱ्याने पेट्रोल टाकले की, कार्ड स्कॅन करणे आणि फोन पेच्या पेमेंटमध्ये बराच वेळ जात होता. त्यात अनेक जण पक्के बिल मागायचे. यात कर्मचाऱ्यांचा वेळ जायचा. त्यामुळे पेट्रोल भरायलाही वेळ लागत होता. विशेष म्हणजे पेट्रोलसोबत ज्या दुचाकी गाड्यांमध्ये ऑईल टाकावे लागते, तशा गाड्या आल्यानंतरही पेट्रोल भरायला वेळ लागत होता. त्यामुळे रांगेत उभे असलेल्या अनेक वाहनधारकांनी अनेक ठिकाणी आरडाओरडा सुरू केला.

तरुणाचा खासगी भाग महिलेने कापला; चौकशी सुरू; पहा Video

छत्रपती संभाजीनगरच्या पेट्रोलियम डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अखिल अब्बास म्हणाले की, दहा जानेवारीपासून सगळे चालक संपावर असल्याचे मेसेज व्हायरल झालेत. मात्र, आमच्या पेट्रोल टँकरच्या चालकांनी आपण संपावर असल्याचे आम्हाला अजून तरी सांगितले नाही. त्यामुळे आपण पेट्रोल पंपावर जाऊन गर्दी करू नये. अशाने शहरात पेट्रोलचा कृत्रिम तुटवडा निर्माण होईल. आपल्याला पेट्रोल-डिझेल टंचाईला सामोरे जावे लागू नये यासाठी, छत्रपती संभाजीनगरमधील प्रत्येक पेट्रोल पंपचालक प्रयत्न करत आहेत. मात्र, आम्हाला तुमची साथ गरजेची आहे. तुम्ही पॅनिक होऊन पंपावर गर्दी केली, तर इंधनाचा कृत्रिम तुटवडा होईल. त्यामुळे तुम्हालाही विनाकारण रांगेत उभे राहावे लागेल. अशा ठिकाणी विनाकारण वादविवाद होतात, असे होऊ नये, असे आम्हाला वाटते.

मोठी बातमी : ऑनलाइन गर्लफ्रेंड स्कीमचा पर्दाफाश; राज्य हादरलं

पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांनी यावेळी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. मालवाहतूकदारांनी गेल्या आठवड्यातही अचानक संप पुकारला. त्यामुळे दोन दिवस शहरवासीयांचे पेट्रोलसाठी हाल झाले. शिवाय पुढचे दोन दिवस पेट्रोल पुरवठा सुरळीत होण्यात गेला. आता पुन्हा तीच स्थिती ओढावली असल्याची खंत अनेकांनी व्यक्त केली. एच. एम. पाटील म्हणाले की, माझ्या दोन्ही मुलींना मला शाळेत सोडावे लागते. ऑफिसला जावे लागते. पेट्रोल नसेल, तर हे सगळे बंद होईल. त्यामुळे आज ऑफिसमधूनच पेट्रोल भरायला आलो. तर अनिल सोनवणे म्हणाले की, मला उद्या बाहेरगावी जायचे आहे. घरातील सर्व कुटुंब सोबत आहे. उद्या पेट्रोल मिळेल याची खात्री नाही, त्यामुळे आजच कारची टाकी भरून घेतली.

petrol-pump

टँकरचालकांपाठाेपाठ आता जड वाहतूकदारही संपाच्या तयारीत आहेत. केंद्र सरकारच्या जड वाहतुकीबाबतच्या कायद्याला विरोध करण्यासाठी अवजड वाहनचालक मालक संघर्ष कृती समितीकडून ‘स्टिअरिंग छोडो’आंदोलन केले जाणार आहे. अपघात झाल्यावर चालकाला मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, हिट अँड रन कायदा रद्द करावा, वाहन सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करावा अशा विविध मागण्यांसाठी अवजड वाहन चालकांनी संप पुकारला आहे. जय संघर्ष संस्था प्रणीत वाहनचालक मालक संघटनचे संस्थापक अध्यक्ष संजय हळनोर व गोरक्ष मदने यांनी ही माहिती दिली.

दरम्यान, हिट अँड रन कायदा लागू केल्यानंतर राज्यभरातील इंधन टँकर चालकांनी संप पुकारला होता. मात्र केंद्रीय गृहसचिवांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसनं ट्रक आणि टँकरचालकांना त्यांचा देशभरातला संप मागे घेण्याचे आवाहन केले होते. हिट अँड रन प्रकरणातल्या कायद्यात नव्या तरतुदी तूर्तास लागू होणार नाहीत, असे आश्वासन केंद्रीय गृह विभागाकडून देण्यात आले. मात्र आता कायद्याला केवळ स्थगिती दिली असली तरी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी अवजड वाहन चालक पुन्हा आक्रमक झाले आहेत.

दहा जानेवारीपासून सगळे चालक संपावर असल्याचे मेसेज व्हायरल झालेत. मात्र, आमच्या पेट्रोल टँकरच्या चालकांनी आपण संपावर असल्याचे आम्हाला अजून तरी सांगितले नाही. त्यामुळे आपण पेट्रोल पंपावर जाऊन गर्दी करू नये. अशाने शहरात पेट्रोलचा कृत्रिम तुटवडा निर्माण होईल.तुम्हालाही विनाकारण रांगेत उभे राहावे लागेल.

– अखिल अब्बास, अध्यक्ष, पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन, छत्रपती संभाजीनगर