CCTV FOOTAGE : मॅडम, 15 देत आहे, ठेवून घ्या ना… सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सर्व काही कैद; काय घडलं ?

CCTV FOOTAGE : पोलिस हे लोकांच्या संरक्षणासाठी, गुन्हे रोखण्यासाठी असतात. पण जर पोलिसानेच एखादा गुन्हा केला तर. मग अशा वेळी कोणाकडे जायचं ? कुंपणानेच शेत खाल्ल तर दाद कोणाकडे मागायची ? अशीच एक घटना बिहारमध्ये उघडकीस आली. जिथे एका महिला पलिस कर्मचाऱ्यानेच लाच घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एकच खळबळ माजली.

Sharad Mohol : संदीप मोहोळच्या हत्येनंतर शरद मोहोळने वैकुंठातच घेतली होती ‘अशी’ शपथ; तपासात अनेक गोष्टी उघड

बिहारमधील सहरसा येथे एका महिला पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडीओमध्ये ती महिला एका पीडित महिलेकडून लाच घेताना दिसत आहे. मॅडम, 15 देत आहे, ठेवून घ्या ना, असं त्या महिलेने पोलिस कर्मचाऱ्याला सांगितल. हा व्हिडीओ आणि लाच घेण्याचा प्रकार लक्षात येताच एसपींनी कारवाई करत त्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला निलंबित केले. मिळालेल्या माहितीनुसार, सहरसा महिला पोलीस ठाण्यात पीडित महिला त्या पोलीस ठाण्याच्या खिडकीतून महिला पोलीस कर्मचाऱ्याला लाच देत होती. यावेळी कोणीतरी त्या घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल केला.

Sharad Mohol : तेव्हापासून आरोपी धुमसतच होते… शरद मोहोळ हत्याप्रकरणातील सर्वात धक्कादायक माहिती उघड

लाच घेण्यासंदर्भातला एक व्हायरल व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये एक महिला पोलीस कर्मचाऱ्याकडून पैसे घेत असल्याचे त्यात दिसून आल्याचे पोलिस उपअधीक्षक एजाज हाफिज मणी यांनी सांगितले. ही बाब निदर्शनास येताच त्या व्हिडिओच्या खरेपणाची पडताळणी करण्यात आली आणि महिला पोलिस अधिकाऱ्याला पोलिस स्टेशनमध्ये नेऊन तिची तपासणी करण्यात आली. हे प्रकरण पैशांच्या व्यवहाराशी संबंधित असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले.

तरुणाचा खासगी भाग महिलेने कापला; चौकशी सुरू; पहा Video

याप्रकरणी कारवाई करण्यात यावी यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवण्यात आले आहे. त्यानुसार, लाच घेणाऱ्या आरोपी महिला पोलीस कर्मचाऱ्याला पोलिस अधिक्षकांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तपासात जी माहिती समोर येईल, त्याआधारे कारवाई केली जाईल.

मोठी बातमी : ऑनलाइन गर्लफ्रेंड स्कीमचा पर्दाफाश; राज्य हादरलं