पुणे, जानेवारी २०२४ : भारतातील सर्वात मोठी उदबत्ती उत्पादक कंपनी असलेल्या सायकल प्युअर अगरबत्तीने स्थानिक कारागिरीच्या समृद्ध परंपरेचा सन्मान म्हणून १११ फूट आकाराच्या उदबत्तीचे अनावरण करून आकाश उजळून टाकले. म्हैसूर, महाराष्ट्र आणि गोवा या तीन सांस्कृतिकदृष्ट्या गजबजलेल्या ठिकाणी एकाच वेळी हा विस्मयकारक कार्यक्रम साकार झाला. त्यातूून विविध कलाकृतींच्या वारशाला आधार देऊन त्याला पुढे आणण्याची बांधिलकी दिसून आली.
सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती यांनी म्हैसूर–कोडगूचे खासदार प्रताप सिम्हा आणि कृष्णराजाचे आमदार टी. एस. श्रीवत्स या माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत उदबत्ती प्रज्वलित केली. श्री. गुरू, श्री. किरण रंगा, श्री. विष्णू रंगा, श्री. अनिरुद्ध रंगा आणि श्री. निखिल रंगा यांच्यासह रंगा कुटुंबाने या प्रसंगी हजर राहून आपला वारसा आणि पारंपारिक कलाप्रकार जपण्यासाठी ब्रँडची बांधिलकी दाखवून दिली. महाराष्ट्रात माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांनी राज्याच्या समृद्ध कारागिरीचा गौरव केला, तर गोव्यात माननीय मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांनी राज्यातील अद्वितीय कलात्मक अभिव्यक्तीचे जतन आणि संवर्धन करण्यावर भर दिला.
सायकल प्युअर अगरबत्तीची ही १११ फूट उंच सर्वोत्कृष्ट कलाकृती म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान आणि पारंपरिक कला प्रकारांच्या संगमाचा पुरावा आहे. म्हैसूरच्या कारागिरांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाला ती एक गहिरी मानवंदना आहे. ही भव्य उदबत्ती १८ कुशल व्यक्तींच्या समर्पित टीमने २३ दिवसांमध्ये तयार केली आहे. त्यासाठी चारकोल, जिगट आणि गूळ यांच्यासह विशेष निवडलेल्या शुभ दशांगाच्या सामग्रीचा वापर करण्यात आला आहे– मध, कोनेरी गेड्डे, तूप, चंदन लाकूड पावडर, गुग्गुळ, आगरू, सांब्रा
याप्रसंगी श्रीमती सरस्वती कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाल्या, “आमच्या कुटुंबातील अनेक पिढ्या कलेसाठी समर्पित आहेत. सायकल प्युअर अगरबत्तीने आमच्या कार्याला पाठिंबा देण्यासाठी आणि स्वीकारण्यासाठी सक्रिय भूमिका घेतल्याचे पाहून खरोखर आनंद होत आहे. ही मान्यता एका साध्या सन्मानापेक्षा खूप काही जास्त आहे. केवळ आमच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण कलावंत समुदायासाठी अतुलनीय मूल्य असलेली गहिरी बांधिलकी त्यातूून दिसून येते. हा आधार विशेषतः आमचे सर्वाधिक सांस्कृतिक योगदान असलेल्या म्हैसूरमधील कलावंतांसाठी महत्त्वाचा आहे. व्यापक सर्जनशील वातावरणासाठी हा एक अनमोल संदेश आहे.”
कार्यक्रमात बोलताना एनआर ग्रुपचे अध्यक्ष श्री. गुरु म्हणाले, “अध्यात्मात रुजलेला एक ब्रँड या नात्याने कलावंतांच्या समुदायाला पाठिंबा देण्याची आम्ही सातत्याने बांधील आहोत. लोकांच्या जीवनात आशेचा स्रोत व्हावे, हे आमचे ध्येय आहे आणि ही १११ फुटांची उदबत्ती त्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे. तिच्या सुगंधाने कारागिरीच्या त विश्वात आनंद पसरेल.”
याप्रसंगी बोलताना म्हैसूर–कोडगूचे खासदार श्री. प्रताप सिम्हा म्हणाले, “आपल्या कलात्मक वातावरणाला आकार देणाऱ्या प्रतिभावान कारागिरांचा सन्मान करणाऱ्या या विशेष सोहळ्याचा भाग बनणे ही खरोखरच सन्मानाची बाब आहे. या व्यक्ती आपल्या सांस्कृतिक अस्मितेच्या संरक्षक आहेत. त्यांना पाठिंबा देणे, विशेषत: म्हैसूरमधील असलेल्यांना, हा विशेषाधिकार आणि जबाबदारी दोन्ही आहेत. आपल्या सांस्कृतिक कथनाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार्या समर्पित कारागिरांना ओळखून आणि त्यांचे उत्थान करून आमच्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी योगदान देणे ही आनंदाची बाब आहे.”
परंपरा नावाच्या अनोख्या सुगंधाने युक्त आणि अखंड ज्योती म्हणून ओळखली जाणारी ही अगरबत्ती आदरणीय श्री. रंगा राव आणि कुटुंबीयांनी घडविली आहे. या उदबत्तीत परंपरा आणि स्मरणरंजनाचा स्पर्श आहे. त्यामुळे तो सर्वात प्रिय सुगंध बनला आहे. हा प्रयत्न म्हणजे सांस्कृतिक वारशाचे सार जतन करून त्याचे प्रदर्शित करण्याच्या सायकल प्युअर अगरबत्तीच्या कटिबद्धतेचे प्रतीक आहे.