Pune Crime News : पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याची हत्या, चार जणांनी मिळून एकाला संपवलं

पुणे : पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. येरवडा कारागृहात झालेल्या हत्येने एकच खळबळ उडाली असून ही घटना गुरुवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. (Pune Crime News)

आईच्या डोळ्यासमोर डंपरने चिमुकल्याला चिरडलं, जागीच मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना

महेश महादेव चंदनशिवे असे हत्या झालेल्या कैद्याचे नाव आहे. पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याचं सांगितलं जातंय. येरवडा कारागृहातच शिक्षा भोगत असलेल्या ४ जणांनी हत्या केल्याची माहिती मिळत आहे.

Siddharth Bhokare : राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मीडीया प्रदेशाध्यक्ष पदी सिद्धार्थ भोकरे यांची निवड

या चारही आरोपींच्या विरोधात पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कात्रीने आणि धारदार हत्याराने गळ्यावर वार करत हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलिस करीत आहेत.

मालक कामावरून काढून टाकणार, भर रस्त्यात केला चाकू हल्ला; घटनेचा व्हिडिओ आला समोर

yervada