युरोपात नाट्योत्सवाचा जल्लोष – अभिमंचच्या युरोपियन एकांकिका स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद

By: Editor_Manas

On: Wednesday, June 3, 2026 6:21 PM

Google News
Follow Us

प्रतिनिधी – मानस : युरोपमध्ये वास्तव्यास असलेल्या मराठी रसिकांसाठी नेदरलँड्स येथे आयोजित करण्यात आलेली ‘अभिमंच’ प्रस्तुत पहिली युरोपियन मराठी एकांकिका स्पर्धा नुकतीच उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडली. या स्पर्धेत भारतासह विविध युरोपीय देशांतील कलाकारांनी सहभाग नोंदवत मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा जागतिक स्तरावर अधोरेखित केली. पुण्यातील स्पर्धकांनीही आपल्या उत्कृष्ट सादरीकरणातून विशेष छाप पाडली.

स्पर्धेचे परीक्षण ज्येष्ठ रंगकर्मी आणि शंभरहून अधिक नाटकांचे दिग्दर्शक विजय केंकरे यांनी केले. त्यांच्यासोबत नाट्यकलेचे अभ्यासक सचिन कंटक यांनी सहपरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.

‘अभिमंच’च्या वतीने आयोजित या स्पर्धेत एकूण १३ संघांनी सहभाग घेतला होता. भारत, ब्रिटन, स्वित्झर्लंड, जर्मनी आणि नेदरलँड्समधील कलाकारांनी आपल्या कलाविष्काराचे सादरीकरण केले. मायभूमीपासून हजारो किलोमीटर दूर राहूनही मराठी नाट्यकलेप्रती असलेली निष्ठा आणि प्रेम या स्पर्धेत प्रकर्षाने दिसून आले.

स्पर्धेतील प्रत्येक संघाला एकांकिका सादर करण्यासाठी आणि नेपथ्य उभारणीसाठी अवघा एक तास देण्यात आला होता. विविध विषयांवर आधारित सादर झालेल्या एकांकिकांनी प्रेक्षकांना नाट्यकलेची अनोखी मेजवानी दिली. अभिनय, दिग्दर्शन, लेखन, प्रकाशयोजना, नेपथ्य आणि तांत्रिक बाबींमध्ये उच्च दर्जा पाहायला मिळाल्याने परीक्षकांनाही विजेत्यांची निवड करताना मोठी कसरत करावी लागली.

या स्पर्धेच्या यशामागे ‘अभिमंच’च्या संपूर्ण टीमचे अनेक महिन्यांचे परिश्रम आहेत. योग्य नाट्यगृहाची निवड, तांत्रिक सुविधा, प्रायोजकांची जुळवाजुळव, प्रसिद्धी, तिकीट व्यवस्थापन आणि सहभागी तसेच प्रेक्षकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आव्हान आयोजकांनी यशस्वीरीत्या पेलले.

युरोपमध्ये घर, नोकरी, व्यवसाय आणि कुटुंबीयांची जबाबदारी सांभाळत मराठी नाट्यसंस्कृती जपण्यासाठी केलेले हे प्रयत्न कौतुकास्पद ठरले. या नाट्योत्सवाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मराठी रंगभूमीचा आवाज जागतिक स्तरावर अधिक बुलंद झाला असून हा सोहळा प्रेक्षकांच्या स्मरणात दीर्घकाळ राहणार आहे.

विजेत्यांची यादी

सर्वोत्कृष्ट लेखक

  • प्रथम : रेश्मा विकास (पन्नादायी)
  • द्वितीय : हृषीकेश पालवे (मोह-माया)
  • तृतीय : तन्मय मेहेंदळे (Soulmates)

सर्वोत्कृष्ट संगीत

  • प्रथम : पन्नादायी
  • द्वितीय : Soulmates
  • तृतीय : मोह-माया

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन

  • प्रथम : रेश्मा विकास (पन्नादायी)
  • द्वितीय : अक्षय ढोले (दोन शूर)
  • तृतीय : सुजाता जोशी, विद्येश खळदकर (मोह-माया)

सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना

  • प्रथम : आशुतोष सप्रे (पन्नादायी)
  • द्वितीय : अभिज्ञ कडू (दोन शूर)
  • तृतीय : विक्रांत महल्ले, तन्मय मेहेंदळे (Soulmates)

सर्वोत्कृष्ट नेपथ्य

  • प्रथम : आसौमित्र शहा (दोन शूर)
  • द्वितीय : सचिन जोशी, तन्मय मेहेंदळे, शर्वरी मेहेंदळे (Soulmates)
  • तृतीय : मानसी बर्वे (मोह-माया)

सर्वोत्कृष्ट अभिनेता

  • प्रथम : अक्षय ढोले (दोन शूर)
  • द्वितीय : सिद्धेश धर्माधिकारी (पन्नादायी)
  • तृतीय : आनंद शुक्ल

सर्वोत्कृष्ट एकांकिका

  • प्रथम : पन्नादायी
  • द्वितीय : दोन शूर
  • तृतीय : मोह-माया
For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

Trupti Desai

July 15, 2026

July 13, 2026

July 13, 2026

July 12, 2026

July 11, 2026

July 9, 2026