मुंबई : ठसकेबाज गाण्यांवर प्रेक्षकांना ठेका धरायला लावणाऱ्या गौतमी पाटीलने (Gautami Patil) अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. गौतमी पाटीलच्या नावानेच कार्यक्रमांना प्रेक्षकांची तुफान गर्दी होते. ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ म्हणणारे तिचे असंख्य चाहते संपूर्ण राज्यभरात आहेत. आता हीच गौतमी तिच्या नव्या म्युझिक व्हिडीओमध्ये पोलीस अधिकारी बनली आहे. ‘इश्काचा मौका आणि झाला नजरेचा धोका… आता कसं व्हायचं पावन, चीझ मी लई कडक’ असे गौतमीच्या नव्या गाण्याचे बोल आहेत.
सप्तसूर म्युझिकच्या नव्याकोऱ्या गाण्यात ती झळकली असून या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ सप्तसूर म्युझिकच्या यूट्यूब चॅनलवर लाँच करण्यात आला आहे.
सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष आणि बीना राजाध्यक्ष यांनी ‘चीझ लई कडक’ या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. विकी वाघ यांनी त्याचं गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन केलं आहे. हे गाणं वैशाली सामंतने गायलं आहे. तर या गाण्यात गौतमी पाटीलसह कुणाल पाटील, कुणाल मासले, मनोज कुंभार, आदम शेख हे कलाकारसुद्धा झळकले आहेत. अतिशय धमाल शब्द, ठेका धरायला लावणारी उडती चाल असल्याने या गाण्याला प्रेक्षकांकडून नक्कीच दाद मिळेल, असा विश्वास सप्तसूर म्युझिककडून व्यक्त करण्यात आला आहे.
‘चीझ लई कडक’ या गाण्यासाठी गुंडांच्या अड्ड्याचा सेट उभारण्यात आला आहे. या अड्ड्यावर गुंडांमध्ये वाद होत असताना गौतमीची धडाकेबाज एण्ट्री होते. या गाण्यातील गौतमीच्या दिलखेचक अदांवर प्रेक्षक फिदा झाले आहेत. या व्हिडीओला गेल्या 18 तासांत 8 हजारांहून अधिक व्ह्यूज आणि 400 हून अधिक लाइक्स मिळाले आहेत.
Sexual abuse : मामीकडून भाचीवर लैंगिक अत्याचार; विवस्त्र करून…
गौतमीच्या कार्यक्रमांना प्रेक्षकांची अक्षरश: झुंबड उडते. आपल्या नृत्यातून आणि दिलखेचक अदांनी गौतमीने तरुणांना घायाळ केलं आहे. तिच्या गाण्यांवर लाइक्स आणि कमेंट्स वर्षाव होतो. पार्ट्यांमध्येही गौतमी पाटीलची गाणी वाजवली जातात. आता या नव्या म्युझिक व्हिडीओमध्ये कातिल गौतमी पाटीलचा वेगळाच अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. सुरुवातीच्या काळात गौतमीच्या कार्यक्रमांवर विशेषकरून तिच्या डान्सवर आक्षेप घेण्यात आला होता. ती डान्सदरम्यान अश्लील अदा करत असल्याची टीका झाली होती. या टीकेनंतर गौतमीने स्वत:हून माफी मागितली आणि अश्लील वाटणाऱ्या स्टेप्स करणं तिने टाळलं.
Christmas Day 2023 : शाळेत मुलांना ‘सांताक्लॉज’ बनवू नका अन्यथा कारवाई, कुणी काढले फर्मान?