Vivo X100 Series
Vivo X100 Series Launched in India : चीनी स्मार्टफोन कंपनी विवोने त्यांची विवो एक्स १०० सीरिज भारतात लॉन्च केली, ज्यात विवो एक्स १०० आणि विवो एक्स १०० प्रो यांचा समावेश आहे. विवोची एक्स सीरिज कॅमेऱ्यासाठी ओळखली जाते. अनेक वापरकर्ते विवोच्या कॅमेऱ्याची आयफोनशी तुलना करतात. याशिवाय ग्राहकांना विवो एक्स १०० सीरिजमध्ये अनेक आकर्षित असे फीचर्स मिळतात, ज्यामुळे वापरकर्ते आयफोनपेक्षा चांगले फोटो काढू शकतात. विवोच्या एक्स सीरिजमध्ये Zeiss ब्रँडचा कॅमेरा मिळतो.
Ultratech Company : अल्ट्राटेक कंपनीच्या दडपशाही विरुद्ध कामगार झाले एकत्र; पहा Video
Vivo X100 Series Specifications
कंपनीने विवो एक्स १०० या स्मार्टफोनला १२ जीबी रॅम/२५६ जीबी स्टोरेज आणि १६ जीबी रॅम/५१२ जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये लॉन्च केले. विवो एक्स १०० (१२ जीबी रॅम/२५६ जीबी स्टोरेज) ची किंमत ६३ हजार ९९९ रुपये आहे. तर, १६ जीबी रॅम/५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंट असलेल्या स्मार्टफोनची किंमत ६९ हजार ९९९ रुपये आहे. तर, विवो एक्स १०० प्रो स्मार्टफोनची किंमत ८९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. हा फोन १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेजसह लॉन्च करण्यात आला आहे.
Crime News : धक्कादायक! मुलांनी बागेतील फुले तोडल्याच्या रागातून अंगणवाडी सेविकेचे नाक कापले
येत्या ११ जानेवारीपासून विवो एक्स १०० सीरिज विक्रीसाठी उपलब्ध होतील. विवोची अधिकृत वेबसाईट, स्टोअर किंवा ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून यापैकी कोणताही फोन खरेदी करता येऊ शकतो. या स्मार्टफोनच्या खेरदीवर एचडीएफसी आणि एसबीआयच्या ग्राहकांना १० टक्के अतिरिक्त सूट दिली जात आहे.
Gautami Patil : गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात तुफान राडा, पोलिसांचा लाठीमार
Vivo X100 Series मध्ये ग्राहकांना ६.७८ इंचाचा डिस्प्ले मिळत आहे. या फोनमध्ये १२ जीबी आणि १६ जीबी रॅमसह ५१२ जीबी स्टोरेज पर्याय मिळतो. तसेच फोटोसाठी ५०+६४+५० मेगापिक्सल ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला. याशिवाय फोनमध्ये ५ हजार एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे, जे १२० वॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
प्रो व्हेरियंटमध्येही ग्राहकांना विवो एक्स १०० सारखीच फीचर्स मिळतात, फक्त कॅमेरा आणि बॅटरीमध्ये फरक आहे. विवो एक्स १०० प्रोमध्ये ग्राहकांना ५०+५०+५० ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. तर, सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमरा देण्यात आला आहे. याशिवाय, या फोनमध्ये ५ हजार ४०० एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळत आहे.