Sharad Mohol Case : पोळेकरने शरद मोहोळला सीसीटीव्हीसमोरच का मारलं माहिती आहे का? वाचा धक्कादायक कारण…
Sharad Mohol Case : ५ जानेवारी २०२४ ला कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भरदिवसा हत्या करण्यात आली. गँगस्टर शरद मोहोळच्या हत्येन पुणे शरद हादरलं आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे शरद मोहोळच्या साथीदारांनीच त्याची हत्या केली. मुख्य आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर यांच्यासह ८ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं ज्यांनी शरद मोहोळचा त्याच्या लग्नाच्या वाढदिवसादिवशीच एकट्यात गाठतं अंत केला.
पण मोहोळच्या या हत्या प्रकरणात एक धक्कादायक अँगल समोर आला तो सीसीटीव्हीचा. शरद मोहोळच्या हत्येची संपुर्ण घटना ही सीसीटीव्हीतमध्ये अगदी स्पष्ट कैद झाली. तो सीसीटीव्ही आपण सर्वांनी माध्यमांमध्ये आणि सोशल मिडीयावर व्हायरल देखील झाला. पण त्यामुळे प्रश्न असा पडतो की. आरोपी मुन्ना जो त्याच भागात राहायचा त्यानं शरद मोहोळला त्या सीसीटीव्ही समोरचं का मारलं?
पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ याची भरदिवसा कोथरुडमधील सुतारदरा या त्याच्या घरच्या परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शरद मोहोळवर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. लग्नाच्या वाढदिवसादिवशीच दगडूशेठला जात असताना एकट्यात गाढून शरद मोहोळची हत्या करण्यात आली. हत्येचा हा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. तोही एकदम स्पष्ट, म्हणजे आजपर्यंत अनेक गँगस्टरची हत्या झाली. पण कुठल्याही मोठ्या गँगस्टरच्या हत्या एवढ्या मोक्याच्या वर्दळीच्या ठिकाणी आणि तेही त्यांच्याच घराच्या परिसरात त्यातही हत्येचा व्हिडीओ किंवा सीसीटीव्हीत कैद झालेली ही कदाचित पुण्यातील पहिलीच घटना असेल.
Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर, मुळशीमध्ये तीन ठिकाणी गोळीबार
त्यामुळं आरोपी मुन्नानं ही हत्या मुद्दामहुन सीसीटीव्ही समोर घडवून आणली का? अशीही शंका उपस्थित होते. कारण शरद मोहोळ आणि आरोपी मुन्ना हे एकाच परिसरात रहायचे. त्यामुळे मुन्नाला त्या भागाची खडानखडा माहिती होती. त्यामुळे ज्या सीसीव्हीत ही घटना कैद झाली त्याबद्दलही मुन्नाला चांगलंच माहित होत. (Latest Marathi News)
त्यात आरोपी अनेक दिवस शरद मोहोळ सोबत होता. त्याची रेकी करत होता त्यामुळे शरदच्या घराच्या आसपासच्या आणि घरातल्या गोष्टी सुद्धा मुन्नाला ठावूक होत्या. त्यामुळेच मुन्नाच ठरवून शरदच्या हत्येसाठी त्याचा लग्नाचा वाढदिवस पकडला.
आणि आपण पावणेचार मिनीटाचा सीसीटीव्ही जर पाहिला शरद मोहोळ जेव्हा घरातून बाहेर येतो तेव्हाही आरोपी सोबत होता तो पर्यंत त्याला काहीच होत नाही. पण जेव्हा शरद मोहोळ सीसीटाव्हीच्या भागात येतो तेव्हा त्याची हत्या होते.
मुन्ना त्यावेळी फायरिंग करतो. आणि दुसरा आरोपी सुद्धा सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसून येता. तो त्याच भागात आधीपासून उभा राहतो जो भाग सीसीटीव्ही कव्हर करतोय. आणि महत्वाच म्हणजे दोन्ही अटॅक करणारे पायी होते. दुसरा आरोपीसुद्धा एखाद्या सामान्य तिथल्या रहिवाश्याप्रमाण तिथं फिरत होता. आणि त्यालाही या सीसीटीव्ही बद्दल माहिती होती.
म्हणजे सीसीटीव्ही जो भाग कव्हर करतो त्या भागात मोहोळ येऊपर्यंत शरद मोहोळवर अटॅक करण्यात आला नाही. असं तर शरद मोहोळचं घरं आणि त्याच ऑफीस यात हार्डली १५० ते २०० मीटरचं अंतर असावं. आरोपी तिथेही त्याच्यावर हल्ला करू शकले असते पण आरोपींनी पुर्वनियोजितपणे त्याच भागात शऱद मोहोळवर हल्ला केला हो भाग सीसीटीव्हत येत होता. त्यामुळे हे तर स्पष्ट आहे की आरोपींनी सीसीटीव्हीच्या एरीयातचं शरद मोहोळला गाठलं आणि हत्या केली.
अर्थात दशहत पसरवण हा यामागचा मुख्य उद्देश होता. आणि महत्वाच कारण म्हणजे बदला. आपल्या मामाच्या अपमानाचा बदला घेणं आणि दहशत निर्माण करण्यासाठी आरोपी मुन्नानं शरदच्या घरासमोर, त्याच्याच एरियात आणि सीसीटीव्हीसमोर हत्या घडवून आणली. आता याप्ररणातील नवा खुलासा असा की शरद मोहोळची हत्या करण्यापूर्वी आरोपींनी मुळशीत गोळीबाराचा सराव केला होता. (Crime News)
पिस्तुलं पुरवणाऱ्या दोघांनी प्रकाश नावाच्या व्यक्तीकडून तीन पिस्तुलं आणि ११ काडतुसं खरेदी केली होती. तर, मोहोळवर अचूक हल्ला करता यावा यासाठी मुन्ना पोळेकरसह त्याच्या दोन साथीदारांनी मुळशीत तीन वेळा सराव केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचं कळतंय. आता या प्रकरणात अजून काय काय समोर येतयं हे पाहणं महत्वाचं ठरेल.