हॉकी हरियाणा, हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा दमदार विजयांसह उपांत्यपूर्व फेरीत – 14वी हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धा

पुणे, मार्च 2024: जेतेपदासाठी दावेदार असलेल्या हॉकी हरियाणाने गोलांचा पाऊस पाडताना 14व्या हॉकी इंडिया सीनियर महिला राष्ट्रीय स्पर्धेत पूल डी सामन्यात ली पुड्डुचेरी हॉकीचा 22-0 असा धुव्वा उडवत दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली. हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशानेही सातत्य राखताना आगेकूच केली.

मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम नेहरूनगर, पिंपरी येथे सुरू असलेल्या स्पर्धेत रविवारी ड्रॅगफ्लिकर दीपिकाने (चौथ्या, 11व्या, 14व्या, 15व्या, 42व्या आणि 49व्या मिनिटाला) हॅट्ट्रिकसह सहा गोल केले, याशिवाय भारताची आंतरराष्ट्रीय नवनीत कौर (2वी, 33वी, 45वी), नीलम (15वी, 25वी, 30वी), मोनिका (17वी, 19वी, 53वी), ज्योती (32वी, 33वी), शर्मिला देवी (35वी, 41वी, 45वी), नेहा गोयल (40वी) आणि उदिता (42वी) यांनीही गोल करत हॉकी हरयाणाचा विक्रमी विजय नोंदवण्यात मोलाचे योगदान दिले.

हॉकी हरियाणाने दोन सामन्यांतून तितक्याच विजयांसह पूल डीमध्ये अव्वल स्थान पटकावले.

ओडिशाच्या हॉकी असोसिएशननेही त्यांच्या दुसर्‍या आणि अंतिम पूल ई सामन्यात हॉकी चंडिगडवर 6-1 असा सहज विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

दीप्ती लाक्राने (19वे, 23वे) दोन तर अजमिना कुजूर (15वे), जीवन किशोरी टोप्पो (30वे), मारियाना कुजूर (50वे), लिलिमा मिन्झ यांनी (51वे) ओडिशाच्या हॉकी असोसिएशनसाठी गोल केले.

हॉकी चंडिगडचा एकमेव गोल प्रियांका हिने 26व्या मिनिटाला आला.

ओडिशाच्या हॉकी असोसिएशनने पूल ई मध्ये दोन सामन्यांमधून दोन विजयांसह मिळवून गटात अव्वल स्थान पटकावले. तसेच हॉकी चंडिगड आणि गोवन्स हॉकी यांच्या पुढे बाद फेरीसाठी पात्र ठरले.

पूल एफ सामन्यात, हॉकी मिझोरामने हॉकी राजस्थानचा 20-2 असा एकतर्फी पराभव करून सलग दुसरा विजय नोंदवला.

भारताची स्ट्रायकर लालरेमसियामी हिने(6वा, 29वा, 34वा, 36वा, 56वा, 60वा) सहा गोल केले. लालरिनपुई (13वे, 15वे, 26वे, 51वे, 57वे), लालनेइहपुई (14वे, 22वे, 49वे, 39वे, 39वे), लालरीनपुई एच लालरुआतफेली (11व्या), लालथंटलुआंगी (17व्या), एफ लालबियाक्सियामी (18व्या) आणि मरीना लालरामनघाकी (33व्या) अप्रतिम खेळ करताना हॉकी मिझोरामच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

हॉकी राजस्थानचे दोन गोल उषा कुमारी (33वे) आणि मनिषा शर्माने (46वे) केले.

हॉकी मिझोराम अजूनही अंतिम आठ संघांत स्थान मिळवण्याच्या रेसमध्ये आहे.

अशाप्रकारे सातत्य राखताना हॉकी हरियाणा आणि हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा संघांनी, हॉकी मध्य प्रदेश (पूल ए), हॉकी महाराष्ट्र (पूल बी), हॉकी झारखंड (पूल सी) आणि हॉकी बंगालसह (पूल एच) अंतिम आठ संघांतील स्थान निश्चित केले.उपांत्यपूर्व फेरीतील अद्या दोन संघ निश्चित झालेले नाहीत.

शनिवारी उशिरा संध्याकाळी तामिळनाडूच्या हॉकी युनिटने पूल एच सामन्यात हॉकी गुजरातला 3-0 तसेच हॉकी उत्तराखंडने दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवला 5-0 असे पराभूत केले.

निकाल (रविवार):
पूल-डी: हॉकी हरियाणा: 22(नवनीत कौर 2वी, 33वी, 45वी; दीपिका 4वी पीसी., 11वी, 14वी, 15वी पीसी, 42वी पीसी, 49वी पीसी; नीलम 15वी, 25वी पीसी; 30 पीसी, 17वी, 19वी पीसी, 53वी; ज्योती 32वी, 33वी; शर्मिला देवी 35वी, 41वी, 45वी; गोयल नेहा 40वी; उदिता 42वी) विजयी वि. ली पुड्डुचेरी हॉकी: 0. हाफटाईम: 10-0

पूल-ई: हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा:6(दिप्ती लाक्रा 19वी; 23वी; अजमिना कुजूर 15वी; जीवन किशोरी टोप्पो 30वी पीसी; मरियाना कुजूर – 50वी पीसी; लिलिमा मिन्झ 51वी पीसी) विजयी वि. हॉकी चंडीगड (प्रियांका26व्या मिनिटाला पीसी) ). हाफटाईम 4-1

पूल -एफ: हॉकी मिझोराम: 20(लालरेमसिमी सहाव्या, 29 व्या, 34 व्या – पीएस, 36 व्या, 56 व्या, 60 व्या; एच. लालरुआतफेली 11व्या पीसी; लालरिनपुई 13वे पीसी, 15, 26, 51 पीएस, 57वे; लालनिपुई 14वे, 22वे पीसी, 49वे; लालथंटलुआंगी 17वे पीसी; एफ लालबियाक्सियामी 18वे; वॅनलालहारियापुई 27वे पीसी, 39वे; मरिना लालरामनघाकी 33वे) विजयी वि. हॉकी राजस्थान: 2 (मनिषा शर्मा 46वी पीसी; उषा कुमारी 33व्या मिनिटाला).

शनिवारी नंतरचे निकाल:
पूल-एच: हॉकी युनिट ऑफ तामिळनाडू: 6(नंदिनी 14वी पीसी, 15वी, 34वी, 41वी; कृष्णप्रिया 24वी पीसी; सबरीमनीदेवी 59वी) विजयी वि. हॉकी गुजरात: 0. हाफटाईम: 3-0

पूल-जी: हॉकी उत्तराखंड: 5(कोमल धामी 7वे; बीना पांडे 12वे पीसी; ममता भट्ट 17वे पीसी, 29 पीसी; हेमा सिंग 57 वी पीसी) विजयी वि. दादरा- नगर हवेली आणि दमण आणि दीव.: 0. हाफटाईम 3-0.

रविवार
एम1 – ले पुडुचेरी हॉकी (लाल) वि हॉकी हरियाणा (पांढरा)
एम2 – हॉकी चंदीगड (पांढरा) वि. हॉकी असोसिएशन ऑफ ओडिशा (लाल)
एम3 – हॉकी राजस्थान (ऑरेंज) विरुद्ध हॉकी मिझोराम (पांढरा)

शनिवारी रात्री उशिरा
एम5 – हॉकी गुजरात (पिवळा) विरुद्ध हॉकी युनिट ऑफ तामिळनाडू (गुलाबी)
एम6 – हॉकी उत्तराखंड (ब्लॅक) विरुद्ध दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव हॉकी (लाल)