उमेद फाऊंडेशनतर्फे पौड येथे बालक-पालक प्रकल्पाचे भूमीपूजन

पुणे : दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सर्वत्र आहेत. परंतू दिव्यांग विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी निवासासाठी सुरू केलेला ‘बालक-पालक’ हा स्तुत्य उपक्रम आहे, असे मत माजी प्रांतपाल लायन रमेश शहा यांनी व्यक्त केले.

उमेद फाउंडेशनच्या वतीने पौड येथे उभारण्यात येत असलेल्या ‘बालक-पालक’ प्रकल्पाचे भूमीपूजन रमेश शहा व स्मिता शहा यांच्या हस्ते झाले. दिव्यांग व्यक्तीसोबत त्यांच्या पालकाना मायेचा निवारा देणारा हा पहिला प्रकल्प आहे, असे या प्रकल्पाच्या मार्गदर्शक सीमा दाबके यांनी सांगितले. 

यावेळी प्रदीप शिंगवी, जयंत पारखी, उद्योजक राजेंद्र रसाळ, सरपंच नरेंद्र लांडगे, राजीव निगडीकर, शामा गोयल, सुधीर राजे, अशोक जव्हेरी, सुभाष देव, उल्हास केंजळे, उमेद फाऊंडेशनच्या लीना देवरे, सुनीता मालतुमकर, मोना नाशिककर, उमेश कुलकर्णी, स्मिता वाळिंबे, उल्का नेहेते यांचेसह पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

श्रीमती प्रतिभा केंजळे यांनी हा प्रकल्प सुरू करून दिव्यांग व्यक्ती व त्यांचे पालक यांना  खराखुरा मायेचा आधार दिला असे मत व्यक्त केले. उमेद फाऊंडेशनचे संस्थापक राकेश सणस यांनी हा सेवाप्रकल्प सर्वांच्या सहकार्याने कार्यान्वित राहणार आहे. यासाठी सर्वांनी सर्व प्रकारचे सहकार्य करावे, असे आवाहन केले.