‘एईएसए’ व्यावसायिक गुणवत्ता पारितोषिकांचे उत्साहात वितरण

पुणे : ‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’च्या वतीने ‘एईएसए व्यावसायिक गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ’ शनिवारी सायंकाळी उत्साहात पार पडला.टाटा प्रोजेक्टस् लि.चे व्यवस्थापकीय संचालक विनायक पै हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. रामप्रसाद आखिशेट्टी यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमात होती.आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा आणि सर्वोत्तम बांधकाम प्रकल्पांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला.

हा पारितोषिक वितरण समारंभ १६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता रॉयल कोर्ट लॉन (चांदणी चौक)येथे झाला. पारितोषिक वितरण समारंभाचे हे २९ वे वर्ष होते.प्रत्येकी ५० हजार रक्कम ,मानचिन्ह असे या पारितोषिकांचे स्वरूप होते.रहिवासी बंगला,इमारत,सोसायटी,इन्स्टिट्यूट,उद्योग,कार्यालय,पूल बांधणी,उद्यान,रेस्टोरंट,दुरुस्ती आणि संवर्धन,युवा आर्किटेक्ट अशा अनेक गटातून ही पारितोषिके दिली गेली.तज्ज्ञांच्या समितीने या प्रकल्पांचे परीक्षण करून नावे निवडली. सीईपीटी युनिव्हर्सिटी कडून मिळालेल्या डॉक्टरेट बद्दल ख्रिस्तोफर बेनिंजर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या वतीने रामप्रसाद आखिशेट्टी यांनी तो स्विकारला.

एकत्रित कामाने शाश्वत विकास शक्य : विनायक पै

विनायक पै म्हणाले, ‘ भारतात शहरीकरणाने वेग पकडला आहे. नव्या संधी तयार झाल्या आहेत. सरकार आणि खासगी क्षेत्राकडून मोठया प्रमाणात बांधकाम क्षेत्रात कामे चालू आहेत. जीडीपीतील मोठा वाटा बांधकाम क्षेत्रामुळे आहे. बांधकामे पूर्ण होताना होणारा उशीर ही सार्वत्रिक आहे. त्याच्या मागील कारणांवरही विचार व्हायला हवा. आर्किटेक्ट, इंजिनियर्सनी जास्तीत जास्त वेळ एकत्र काम केल्यास उपाय निघतील. अधिक चांगले नियोजन करता येईल. गुणवत्तेत वाढ होईल. उत्तम नियोजन ही या क्षेत्रातील यशाची गुरुकिल्ली आहे.एकत्रित कामाने शाश्वत विकास होईल.

ख्रिस्तोफर बेनिंजर यांच्या वतीने उपस्थित प्रतिनिधी रामप्रसाद आखिशेट्टी म्हणाले ,’ भारत परिवर्तनाच्या वाटेवर आहे. आपण सर्व आपल्या कामातून राष्ट्र निर्मितीत कार्यरत आहोत. पुणे बदलत आहे, सातत्याने बांधकामे चालू आहेत, त्यावर आपण गुणवत्तेचा ठसा उमटविला पाहिजे.’ परीक्षकांच्या वतीने लक्ष्मण थिटे यांनी मनोगत व्यक्त केले.

‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ चे प्रेसिडेंट इंजिनिअर पराग लकडे यांनी प्रास्ताविक केले.’आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन’ चे चेअरमन महेश बांगड तसेच आलोका काळे यांनी सूत्रसंचालन केले.विश्वास कुलकर्णी,दिवाकर निमकर,केशव देसाई हे विश्वस्त,खजिनदार हेमंत खिरे, सचिव संजय तासगावकर,सहसचिव मनाली महाजन ,निनाद जोग,शेखर गरुड,मकरंद गोडबोले,नितीन भोळे, आनंद कुंकलोळ,हृषीकेश कुलकर्णी,जयंत पटवर्धन,नुपूर चिचखेडे,स्काँन प्रोजेक्ट्सचे नीलेश चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. राजीव राजे यांनी आभार मानले.

असोसिएशनचे माजी अध्यक्ष आर्कीटेक्ट पुष्कर कानविंदे हे या पारितोषिक वितरण सोहळ्याचे निमंत्रक होते. स्काँन प्रोजेक्ट्स ,एस जे काँट्रॅक्ट्स प्रा लि ,कुमार प्रॉपर्टीज,रोहन बिल्डर्स,बेहरे -राठी ग्रुप , सी एस आर एल प्रा .लि. यांचे सहकार्य या सोहळ्याला लाभले .

बांधकाम क्षेत्रातील नवनिर्मितीचा,उत्तम प्रकल्पांचा गौरव

या कार्यक्रमात उत्तम प्रकल्पांना गौरविण्यात आले.मुख्य पुरस्कारामध्ये प्रकल्पांना प्रत्येकी ५० हजार रुपये प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.अनघा पाटील, अर्चना देशमुख – कुलकर्णी यांना एईएसए यंग अचिव्हर्स अवॉर्ड’ देण्यात आले. २५ हजार रोख, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.

पुण्याबाहेरील नॉन रेसिडेन्सीयल ऑफीस रिटेल प्रकल्पासाठी यश टेक्नोलॉजी प्रा.लि., स्ट्रीट फॉर ऑल प्रकल्प (पेन्सिल चौक , बारामती), करंदीकर वाडा संवर्धन प्रकल्प(सातारा ) या प्रकल्पाला गौरविण्यात आले. साईट मॅनेजमेंटसाठी आय.आय .टी., धारवाड ला तसेच नरेंद्र मोदी स्टेडियम प्रकल्पाला ज्युरी रेकमेंडेशन अवॉर्ड देण्यात आले.

रेसिडेन्शियल विभागात सिंगल फॅमिली हाऊस ॲट कामशेत प्रकल्पाला गौरविण्यात आले. ग्रुप हाऊसिंग प्रकल्पांना आयआयटी गांधीनगर प्रकल्पाला गौरविण्यात आले. जालिहाल हाऊस, राजभवन ( महाबळेश्वर ) या प्रकल्पांना ज्युरी रेकमेंडेशन अवॉर्ड देण्यात आले.

पुण्यातील नॉन रेसिडेन्शियल विभागात संस्थातंर्गत पुरस्कारासाठी व्ही.एन. लाहोटी स्टुडंट होस्टेलला, पुण्यातील कमर्शियल प्रकल्पासाठी तौराल इंडिया प्रा.लि. कार्यालयाला गौरविण्यात आले. इंडस्ट्री विभागासाठी बजाज ऑटो लि. च्या ग्रँड कॅनोपी प्रकल्पाला गौरविण्यात आले. ‘ऑफीस ॲट आमराई ‘ , मंगलम लाईफपार्क एक्स्पीरियन्स सेंटर, कैलास भेळ फूड कोर्ट, एनझेन बायो सायन्सेस लि. या प्रकल्पांना ज्युरी रेकमेंडेशन अवॉर्ड देण्यात आले.

सिंगल फॅमिली होम रेसिडेन्शियल विभागात अभिमानश्री प्रकल्प यांना गौरविण्यात आले.मायरा बंगलो, अरिहंत कृपा होम, हाऊस अराऊंड स्कायलाईट, माहेश्वरी हाऊस , गीते फार्म हाऊस यांना ज्युरी रेकमेंडेशन अवॉर्ड देण्यात आले.

मल्टी टेनमेंट बिल्डींगसाठी अंजली प्रकल्पाला गौरविण्यात आले.तत्व प्रकल्पाला ज्युरी रेकमेंडेशन अवॉर्ड देण्यात आले.ग्रुप हाऊसिंगसाठी मंगलम ब्रीझ प्रकल्पाला गौरविण्यात आले.

पुण्याच्या विकासात ५४ वर्षांचे योगदान:

‘आर्किटेक्ट्स, इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर्स असोसिएशन'(एईएसए ), पुणे ही शहराच्या सर्वांगिण सुधारणेसाठी सर्व प्रकारच्या बांधकाम व्यावसायिकांनी एकत्र येऊन काम करण्यासाठी १९७० मध्ये स्थापन झालेली एक आगळीवेगळी संस्था आहे. ज्ञानाचा प्रसार, मूल्याधारित व्यवसाय, आणि स्थानिक सरकारी संस्थांबरोबर सामंजस्याने काम करण्यासाठी संस्था सतत कार्यरत असते. यामुळे असोसिएशनला आणि व्यावसायिक गुणवत्ता पारितोषिकांना बांधकाम क्षेत्रात मानाचे स्थान आहे.