आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना

गोव्यात दोन भावांच्या संशयास्पद मृत्यूचं प्रकरण समोर आलं आहे. दोन्ही मुलांसह त्यांची आईदेखील घरातच बेशुद्धावस्थेत आढळली आहे. दोन्ही भाऊ भुकेने मरण पावल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे. गोवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मुलांची आई दोन्ही मुलांकडून कडक उपवास करून घेत होती.

Narendra Modi : मोदी सत्तेत आले तर राज्यघटना बदलतील का?

गेल्या अनेक दिवसांपासून ही दोन्ही मुलं दिवसाला केवळ एक खजूर खात होती. कॅशेक्सिया आणि कुपोषण हे दोन्ही मुलांच्या मृत्यूचं संभाव्य कारण असल्याचं शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी नमूद केलं आहे.

पुर्व हवेलीतील दूध विक्रेते व हॉटेल व्यावसायिकांकडून ग्राहकांना गंडा; ५६ रूपयांची दुध पिशवी मिळतेय ५८ रूपयांना; पाण्याचे एक बाटली २९ रूपयांना

मोहम्द जुबैर खान आणि अफान खान अशी या मृत मुलांची नावं आहेत. त्यांची आई रुक्साना खान हिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. तिच्या मानसिक आरोग्याच्या तपासणीसाठी तिला गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या मानसोपचार आणि मानवी व्यवहार संस्थेत (IPHB) पाठवलं जाणार आहे.

प्रेक्षकांनो थिएटरमधला हा नियम बदलला; पीव्हीआर आयनॉक्सचा मोठा निर्णय; काय आहे कारण?

या मुलांचे वडील नजीर खान आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी २४ एप्रिल रोजी मडगाव एक्वेम येथे आले होते. घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यामुळे त्यांनी बराच वेळ दरवाजा ठोठावला. परंतु कोणीही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलीस नजीर खान यांच्या घरी दाखल झाले आणि दरवाजा तोडून आत गेले.

मोठी बातमी : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्याबाबत मोठी अपडेट

पोलिसांनी घरात पाहिलं की अफान खान एका खोलीत मृतवस्थेत पडला होता, तर जुबेर दुसऱ्या खोलीत पडला होता. त्यांची आई अंथरुणावर बेशुद्धावस्थेत पडली होती.

BJP : पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यामुळे भाजपमध्ये मोठी खळबळ; निष्ठावंतांचे मुंबईमध्ये राजीनामे

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार या मुलांचे वडील नजीर खान हे पत्नीबरोबर सातत्याने होणाऱ्या भांडणाला कंटाळून मडगावमधील दुसऱ्या घरात राहायला गेले होते. उपवास करणं, अनियमितपणे जेवण करणं हे पती-पत्नीच्या भांडणाचं प्रमुख कारण होतं. दरम्यान, नजीरचे भाऊ आणि मृत अफान, जुबेर यांचे काका अकबर खान म्हणाले रुक्साना आणि तिची मुले गेल्या काही महिन्यांपासून घराबाहेर आले नव्हते.

Crime News : दारू पिऊन आईवडिलांना मारायचा मुलगा, कंटाळलेल्या बापाने उचलले टोकाचे पाऊल

तिघेही बाहेरच्या जगाशी पूर्णपणे विभक्त झाले होते. अकबर खान म्हणाले, नजीरचं घर आर्थिकदृष्ट्या खूप संपन्न आहे. तरीदेखील त्याच्या पत्नी आणि मुलांनी अशा प्रकारण उपवास करणारं आम्हा सर्वांना कोड्यात टाकणारं आहे.

तरुणीला कुरियरमध्ये अमली पदार्थ असल्याचे सांगून फसविले तर ४० वर्षीय व्यक्तीची परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक; पुण्यात नेमकं चाललंय काय?

पुणेकर हा वडापाव खाल्याशिवाय पुढे जात नाही, असं आहे तरी काय?

Big News : शिंदे गटातील बड्या नेत्याच्या गाडीवर हल्ला; वाहनावर भिरकावला दगड; कारची काच फुटली

ED BIG NEWS : पुण्यात चालले काय; ईडीचे पथक पुण्यात, गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्यावर छापे

ब्रेकिंग : उद्या पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार? काँग्रेसचा बडा नेता काँग्रेस सोडणार

बापरे! सुप्रिया सुळेंच्या डोक्यावर सुनेत्रा पवार, पार्थ यांचे ५५ लाखांचे कर्ज; पहा किती संपत्ती…