शरद पवार गटाच्या बड्या नेत्याने घेतली अजित पवार यांची भेट, बंद दाराआड खलबतं

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार आणि शरद पवार सातत्याने चर्चेत आहेत. या बंडानंतर अजित पवार यांना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ही मिळाले. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार असे पक्षाचे नाव घेतले. त्यांना तुतारी हे पक्ष चिन्ह मिळाले. त्याचे अनावरण आज होणार आहे. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात आज विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सात वाजल्यापासून पुण्यातील सर्कीट हाऊसमध्ये बैठका सुरु आहेत. त्याचवेळी शरद पवार गटाचे बडे नेते राजेश टोपे अजित पवार यांच्या भेटीसाठी दाखल झाले. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दारआड चर्चा झाली.

Gautami Patil : कोणालाच नाही माहिती गौतमी पाटील हिचं खरं नाव, जाणून घ्या काय आहे नाव…

अजित पवार आणि राजेश टोपे यांची बैठक सर्कीट हाऊसमध्ये बंद दाराआड झाली. या चर्चेच्या दरम्यान अन्य कोणी उपस्थित नव्हते. राजेश टोपे अजित पवार यांना भेटून सर्किट हाऊस मधून निघाले. त्यानंतर राजेश टोपे यांना माध्यमांनी गाठले. त्यावेळी त्यांनी चर्चेचा तपशील जाहीर करण्यास नकार दिला. यामुळे या भेटीत काय खलबंत झाले त्याची माहिती नाही. दरम्यान राजेश टोपे यांनी टीव्ही ९ मराठीकडे या भेटीबाबत स्पष्टीकरण केले आहे. मी अजित पवारांना भेटलो नाही. मी त्या सर्कीट हाऊसवर मुक्कामी होतो, असे त्यांनी म्हटले आहे.

पुणे : रिंगरोडबाबत मोठा निर्णय : आचारसंहिता काळात भूसंपादन करायचे की नाही? विभागीय आयुक्तांनी दिला ‘हा’ आदेश

आमदार रोहित पवार कालवा समितीच्या बैठकीला आले आहे. सुप्रिया सुळे या बैठकीला आल्या आहेत. त्यांनी पाण्याच्या विषयावर चर्चा करण्यासाठी आल्याचे सांगितले. पाण्यासंदर्भात ही बैठक आहे. परंतु अजित पवार, रोहित पवार यांच्यात काय चर्चा होते का? हे ही समजणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार आणि अजित पवार यांच्यात चांगला कलगीतुरा रंगला आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत ही बैठक चालणार आहे.

Suicide : शेवटी तिने टोकाचा निर्णय घेतलाच…पतीवर जीवापाड प्रेम करणार्‍या पत्नीची आर्थिक विवंचनेतून आत्महत्या

कालवा समितीच्या बैठकीमध्ये पिण्यासाठी आणि शेतीसाठी उन्हाळ्यात पाण्याचे नियोजन ठरवले जाईल. त्यानंतर अजित पवार दुपारनंतर बारामती लोकसभा मतदार संघातील, भोर, मुळशी आणि खडकवासला मतदार संघात ते कार्यकर्त्यांचे मेळावे घेणार आहेत. तसेच काही पक्ष प्रवेश देखील होणार आहेत.

BIG NEWS : पुण्याचा पाणी प्रश्न मिटणार, अशी आहे पुणेकरांसाठी योजना

Journalist : पत्रकारांना धमकी देणाऱ्यास होणार ५० हजार दंड व ३ वर्षांपर्यंत तुरुंगवास

BIG NEWS : पहिल्या नजरेतच तो बिजनेस वुमनच्या नजरेत भरला, त्याच्या कारमध्ये GPS ट्रॅकर लावला आणि मग, एकदिवस…