---Advertisement---

Big Breaking Manoj Jarange Patil : मनोज जरांगे यांची घोषणा…म्हणाले

By: Editor_Pratik

On: Saturday, December 23, 2023 1:01 PM

Manoj Jarange Patil
Google News
Follow Us
---Advertisement---

बीड : मराठा आरक्षणाचा विषय आता चांगलाच पेटणार असल्याचं दिसत आहे. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा उद्या म्हणजेच 24 डिसेंबरल शेवटचा दिवस आहे. त्याआधी मनोज जरांगे यांनी बीडमध्ये घेतलेल्या सभेत मोठी घोषणा केली आहे. मनोज जरांगे आमरण उपोषण करणार असून आता मोर्चा थेट मुंबईकडे येणार आहे. मुंबईमध्ये 20 जानेवारीला आझाद मुंबईवर उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

Brijbhushan Singh’s son : ब्रिजभूषण सिंह यांच्या मुलाने झळकावले पोस्टर; पोस्टरवर लिहिले असे काही की…

मुंबईतील आझाद मैदानात 20 जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत. आपल्या पिकाला पाणी देऊन घ्या. अंतरवाली हून मराठ्यांचा जनसागर मुबंईला जायचं आहे. मराठा समाजाला डाग लागला नाही पाहिजे, कोणी गाडी पेटवायला लागला तर त्याला जाग्यावर पकडून पोलिसांकडे द्यायचं, आपला असेल तरी त्याला पकडून पोलिसांकडे द्या. मराठा समाजाचे आमदार, खासदार आणि मंत्री यांना विनंती आहे. मराठा समाजाच्या लेकरांच्या पाठीशी उभे रहा. जर पाठीशी उभे नाही राहिलात तर मराठ्यांचे घर तुम्हाला कायम स्वरूपी बंद राहिल, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange Patil

मुंबईला जायचा मार्ग दोन तीन दिवसात ठरवूयात, कुठून कसे, काय दिसते ते पाहू. कोण ट्रॅक्ट्रर कसा अडवतो ते बघतो. आमचा ट्रॅक्टर, डिझेल आमचं सगळं आमच तू कसं अडवतो. भुजबळच्या पोटात आळी आहे. आभाळ आलं की ती आळी वळवळ करते. मराठे जर मुबंईकडे निघाले तर मराठ्यांचा विराट समुदाय माघारी फिरणार नाही. आता माघार नाही. आता देव जरी आडवा आला तरी मराठे आरक्षण मिळवणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे.

Viral Video : लग्नात पनीरवरून राडा, एकमेकांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या, भर मंडपात…

मराठा कधीच जाळपोळ करू शकत नाही. कुणाच्या घरावर जाऊ शकत नाही. यांची घरे यांनीच फोडले. आमच्यावर नाव घेत आहे. यांनाच कंड आहे. सर्व बावचळले आहेत. येवल्याच्या येडपटाने त्यांच्या पाहुण्यांची हॉटेल जाळली. बाजारात पिशवी घेऊन हिंडत आहे. बघा आम्हाला कशा शिव्या देतात. कशाला मग बोलतो. आता पिशवी घेतली. आता केळाची सालं आणि चपला दिसतील. तुला आताच खाल्लेलं पचत नाही. थांब थोडं. माझ्या नादी लागू नको आधीच सांगितलं होतं.

पुणे प्रहार माध्यम समुहाच्या ‘आरंभ पर्व’चे विशेष विश्वलेषण

For Feedback - feedback@example.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

March 9, 2026

PMC BIG NEWS

March 9, 2026

March 9, 2026

iQOO Z11x

March 9, 2026

March 9, 2026

March 9, 2026