BIG NEWS : ठाकरे गटाला मोठा धक्का…; आगामी निवडणुकीवर मोठ्या परिणामाची शक्यता

एरंडोल येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

ठाकरे गटाचे शहरप्रमुख असलेले कुणाल महाजन हे शिवसेनेचे जुने आणि ठाकरे गटाचे कट्टर समर्थक तथा समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन आणि माजी नगराध्यक्षा शोभा महाजन यांचे पुत्र असल्यामुळे त्यांच्या प्रवेशास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

thakre-gat

शिवसेनेत फूट पडल्यानंतर शहरातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटातच राहण्याचा निर्णय घेतला होता. ग्रामीण भागातील अनेक पदाधिकाऱ्यांनी आमदार चिमणराव पाटील आणि जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवून शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता.

ठाकरे गटाचे शहरप्रमुख तथा माजी उपनगराध्यक्ष कुणाल महाजन यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

या वेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, मंगेश चिवटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Video : पुण्यात मुलीचे कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल करून…

मुख्यमंत्री शिंदे यांनी कुणाल महाजन यांचा सत्कार करून त्यांचे पक्षात स्वागत केले. कुणाल महाजन हे ठाकरे गटाचे शहरप्रमुख असताना युवकांना संघटित करून पक्ष संघटन मजबूत केले होते. २०१६ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत त्यांची अपक्ष उमेदवारी अर्ज भरून विजय प्राप्त केला होता.

कुणाल महाजन यांचे वडील रमेश महाजन, रमेश महाजन यांची कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असून, त्यांनी शिवसेना एकसंघ असताना तालुकाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणून काम पाहिले आहे.

तसेच १९९५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक रमेश महाजन यांनी शिवसेनेकडून लढविली होती. यापूर्वी ठाकरे गटात असलेले व सध्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून काम करीत असलेले वासुदेव पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, पंचायत समितीचे माजी सभापती अनिल महाजन यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश करून ठाकरे गटाला धक्का दिला आहे.

#Prajakta Mali : प्राजक्ता माळीने हातावर गोंदवलंंय ‘या’ खास व्यक्तीचं नाव; टॅटू दाखवत केलेला मोठा खुलासा

शहरासह ग्रामीण भागातील अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कुणाल महाजन यांच्यावर पक्षाची मोठी जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे.