#Prajakta Mali : प्राजक्ता माळीने हातावर गोंदवलंंय ‘या’ खास व्यक्तीचं नाव; टॅटू दाखवत केलेला मोठा खुलासा

By: Editor_Pratik

On: Sunday, December 31, 2023 7:23 AM

Prajakta Mali
Google News
Follow Us

#Prajakta Mali : महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. तिचं सोशल मीडियावर तुफान फॅन फॉलोईंग आहे.

#PavitraPunia : सीन शूट करताना हुक तुटले अन्…, प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर सेटवर घडला धक्कादायक प्रसंग; फोटो व्हायरल

प्राजक्ता माळीने आपल्या हातावर एका खास व्यक्तीचं नाव गोंदवून घेतलंय. हे व्यक्ती म्हणजे प्रसिद्ध अध्यात्मिक गुरु ओशो. राजश्री मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्तानं आपला टॅटू दाखवत तो गोंदवण्यामागचं कारण देखील सांगितलं होतं.

प्राजक्ताला आपल्या हातावर नेहमीपेक्षा काहीतरी हटके टॅटू हवा होता. याबद्दल बोलताना ती म्हणाली होती की, ‘मी ओशोंबद्दल खूप वाचन करायचे, त्यांच्या सीडी ऐकायचे. माझी त्यांच्यावर अपार श्रद्धा आहे. मला त्यांचे सगळे विचार पूर्णतः पटायचे.’त्यांचं नाव टॅटू म्हणून का गोंदवलं हे सांगताना प्राजक्ता म्हणाली, ‘मला सगळ्यांसारखं फुलं, हृदय, चंद्र, चांदणं अशा कॉमन गोष्टी टॅटू म्हणून नको होत्या.

मला काहीतरी वेगळं हवं होतं. मला टॅटू म्हणून अशी एखादी गोष्ट हवी होती जी प्रेरणादायक असेल आणि धर्माशी निगडित नसेल.’ त्याबद्दल बोलताना ती पुढे म्हणाली, ‘ तेव्हा मी ओशोंची भक्त झाले होते आणि त्यांच्या मते धर्म वगैरे असं काही नसतं. मी पण जात, धर्म अशा गोष्टी मानत नाही. त्यामुळे मी ठरवलं की ओशो हे धर्मनिरपेक्ष नाव आपण गोंदवु शकतो आणि मी त्या नावाचा टॅटू गोंदवला.’ असा खुलासा प्राजक्तानं केला होता.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 20, 2026

September 15, 2026

September 12, 2026

September 4, 2026

September 4, 2026

September 4, 2026