पुणेकरांसाठी एक मोठी बातमी! डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला पेठ भागाशी जोडणारा जबरदस्त आधुनिक पादचारी पूल आता भिडे पुलाच्या वर उभा राहत आहे. मुळा नदीवर वसणारा हा फ्युचरिस्टिक डिझाईन असलेला पूल पाहताच नजर हटणार नाही!
हा पूल नारायण पेठ, शनिवार पेठ आणि लक्ष्मी रस्ता येथील नागरीक व विद्यार्थ्यांना मेट्रो स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी कमालीचा उपयोगी ठरणार आहे.
मात्र… पुणेकरांसाठी एक मोठा धक्का म्हणजे, हा भिडे पूल रविवार २० एप्रिल रात्री १२ वाजेपासून थेट ६ जून २०२५ पर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे! पुढील दीड महिना गाड्यांना ‘नो एंट्री’, ट्रॅफिकचा मोठा फटका बसणार.
ब्रेकिंग ! पुण्याच्या ‘भिडे पुला’वर उभा राहत आहे ‘फ्युचर ब्रिज’ – दिसणार थेट परदेशी शहरांसारखा, पण वाहनधारकांसाठी धक्का !