Venkateshwara Hatcheries Pvt. Ltd. मध्ये वार्षिक पगारवाढ दोन वर्षांपासून रखडली? कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी

By: Editor_Pratik

On: Wednesday, February 18, 2026 7:00 AM

Google News
Follow Us

विशाल भालेराव (Venkateshwara Hatcheries Pvt. Ltd.)

मालखेड – देशातील अग्रगण्य पोल्ट्री उद्योग समूह म्हणून ओळख असलेल्या Venkateshwara Hatcheries Pvt. Ltd. (वेंकटेशश्वरा ग्रुप) कंपनीत वार्षिक पगारवाढ मागील दोन वर्षांपासून रखडल्याची चर्चा सध्या कर्मचाऱ्यांमध्ये जोर धरू लागली आहे.

नियमित पगारवाढ ही कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन, प्रेरणा आणि आर्थिक स्थैर्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र सलग दोन वर्षे वाढ न झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाल्याचे समजते.

काही कर्मचाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, वाढती महागाई, घरखर्च आणि शैक्षणिक जबाबदाऱ्या सांभाळताना पगारवाढ न मिळाल्याने आर्थिक ताण वाढत आहे. “कामाची जबाबदारी वाढतेय, पण त्यानुसार मोबदला मिळत नाही,” अशी भावना कर्मचाऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

दरम्यान, कंपनी प्रशासनाकडून याबाबत अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट करण्यात आलेली नसल्याने संभ्रम कायम आहे. व्यवस्थापनाने लवकरच यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांचा विश्वास कायम ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वार्षिक पगारवाढीचा प्रश्न लवकर निकाली निघाला नाही, तर त्याचा परिणाम कामाच्या वातावरणावर आणि उत्पादकतेवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता सर्वांचे लक्ष कंपनी व्यवस्थापनाच्या भूमिकेकडे लागले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

November 1, 2026

Pratik Gangane

October 31, 2026

October 30, 2026

October 30, 2026

October 28, 2026

October 27, 2026