Ajit Pawar Plane Crash Flight Recorder Update : फ्लाइट रेकॉर्डर जळाले तरी डेटा मिळाला; तपासाबाबत मोठी अपडेट

By: Editor_Pratik

On: Tuesday, February 17, 2026 10:19 AM

Google News
Follow Us

Ajit Pawar Plane Crash : फ्लाइट रेकॉर्डर जळाले तरी डेटा मिळाला; तपासाबाबत मोठी अपडेट

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर होते आणि तीव्र आगीमुळे हे दोन्ही रेकॉर्डर पूर्णपणे जळून गेले असल्याचे एअरक्राफ्ट एक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने स्पष्ट केले आहे.

AAIB ही भारतातील विमान अपघातांची चौकशी करणारी अधिकृत संस्था असून, त्यांनी या प्रकरणात तांत्रिक तपास सुरू असल्याचे सांगितले. मोठ्या आगीमुळे रेकॉर्डरचे मोठे नुकसान झाले असले तरी विशेष लॅबच्या मदतीने त्यातील डेटा डाउनलोड करण्यात यश मिळाल्याची माहितीही देण्यात आली आहे.

तपास प्रक्रियेत सर्व तांत्रिक व प्रक्रियात्मक नियमांचे काटेकोर पालन केले जात असून, कोणतेही तर्क-वितर्क टाळून सहकार्य करण्याचे आवाहन AAIB कडून करण्यात आले आहे.

‘पुढारी’चे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातानंतर तात्काळ प्रकरण AAIB कडे सोपवण्यात आले. लँडिंगदरम्यान झालेल्या स्फोटानंतर घटनास्थळी मोठी आग लागली होती आणि त्यामुळे फ्लाइट रेकॉर्डर तीव्र उष्णतेच्या संपर्कात येऊन जळाले.

तथापि, या रेकॉर्डरमधील महत्त्वाचा डेटा विशेष प्रयोगशाळेतून पुनर्प्राप्त करण्यात आला आहे. पुढील तपासासाठी परदेशातील तज्ज्ञांचे सहकार्य घेतले जात असून, त्या देशाचे नाव मात्र अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

April 21, 2026

Malabar मलबार

April 20, 2026

April 18, 2026

April 17, 2026

April 16, 2026

April 16, 2026