मुलीशी का बोलतो म्हणून मुलावर कोयत्याने वार; प्रकृती गंभीर, क्रिकेट मॅच पाहताना झाली ओळख
सोलापूर : वागदरी येथील शेळके प्रशालेच्या पायरीवर क्रिकेट मॅच पाहत असताना ओळखीतील मुलीशी का बोलतो? म्हणून १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलावर जिवे ठार मारण्याच्या हेतूने परमेश्वर जमादार याने कोयत्याने डोक्यात वार केला. या प्रकरणी साहेबाण्णा रामचंद्र कोळी (रा. वागदरी) यांनी अक्कलकोट उत्तर पोलिसांत दिली आहे.
‘लाडक्या बहिणींना’ १५०० रुपयांऐवजी केवळ ५०० रुपयेच मिळणार?
१३ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादीचा भाचा सुशांत हा वागदरी येथील शेळके प्रशालेच्या पायरीवर बसून मित्रासोबत क्रिकेट मॅच बघत थांबला होता. त्यावेळी रागाने त्याठिकाणी आलेल्या परमेश्वर जमादार याने सुशांतला शिवीगाळ सुरू केली.
ओळखीच्या त्या मुलीशी बोलू नको म्हणून सांगूनही तिला का बोलतो, तुला आता जिवंत सोडत नाही, असे म्हणून हातातील लोखंडी कोयत्याने डोक्यावर वार केला. त्यात गंभीर जखमी झालेल्या सुशांतला तातडीने रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर सोलापुरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
UPI चं नवं ‘सर्कल’ फीचर: आता बायकोसुद्धा करू शकेल तुमच्या खात्यातून थेट पेमेंट!
Crime : महाविद्यालयीन युवतीचा खून; एक संशयित ताब्यात; नातेवाईकांनी फोडला हंबरडा