पुरोगाम्यांच्या हत्यांचे भांडवल करून सनातन संस्थेचा बळी घेण्याचा प्रयत्न! – अभय वर्तक, प्रवक्ता, सनातन संस्था

 ‘स्वयंघोषित विचारवंतांचे उदात्तीकरण का?’ – विशेष परिसंवाद !

कॉपानसरेडॉनरेंद्र दाभोलकर या तथाकथित पुरोगाम्यांच्या हत्या प्रकरणांमध्ये तपास यंत्रणांवर मोठा दबाव टाकण्यात आलाअन्वेषण यंत्रणांनी तपास काय केलायाकडे लक्ष न देताकेवळ वारंवार सनातन संस्थेवर बंदी घालण्याची मागणी केली जात होतीडॉदाभोलकर हत्या प्रकरणात ५ तरुणकॉपानसरे हत्या प्रकरणात १२ तरुणगौरी लंकेश हत्या प्रकरणात १८ तरुणतर कलबुर्गी हत्या प्रकरणात ६ तरुणांना अटक करण्यात आलीया सर्वांना जामीन मिळू न देता त्यांना  कारागृहातच सडवण्याचे काम पुरोगामी मंडळी करत होतीमहाराष्ट्रात सनातन संस्था ही एक आध्यात्मिक संस्था असूनहीतिला आतंकवादी संस्था ठरवण्यासाठी प्रचार करून खोटे ‘नॅरेटिव्ह’ तयार करण्यात आलेपुरोगाम्यांनी झुंडशाहीच्या माध्यमातून सनातन संस्थेचा बळी घेण्याचा प्रयत्न केलाविशेषतःकॉपानसरे हत्या प्रकरणात न्यायाची मागणी करणार्‍या पानसरे कुटुंबीयांनीच खटला चालू नये यासाठी सर्वाधिक प्रयत्न केल्याचा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते श्रीअभय वर्तक यांनी केलाते ‘स्वयंघोषित विचारवंतांचे उदात्तीकरण का?, कॉम्रेड्सच्या हत्या आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती!’ या विषयावरील ऑनलाईन विशेष परिसंवादात बोलत होते

कॉपानसरे यांच्या विचारांचे खरे स्वरूप काय? – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

      या परिसंवादात ‘हिंदु विधीज्ञ परिषद’चे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर म्हणाले, ‘‘कॉपानसरे यांनी माजी पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ यांच्या ‘हू किल्ड करकरे?’ या पुस्तकाचा प्रचार केलाया पुस्तकात भारतीय गुप्तचर यंत्रणांवर संशय व्यक्त करूनकसाबसारख्या आतंकवाद्यांना समर्थन देण्याचा प्रयत्न होतामग अशा पुस्तकाचे प्रचारक असलेले कॉपानसरे निश्चित कोणत्या विचारांचे होतेत्याचप्रमाणेडॉनरेंद्र दाभोलकर यांच्या संस्थेला परदेशातून निधी मिळत असल्याचा आरोप आहेत्यांच्या ट्रस्टमध्ये चालणार्‍या घराणेशाहीच्या विरोधात त्यांचेच कार्यकर्ते अविनाश पाटील यांनी बंड केलेपण यावर कोणीही चर्चा करत नाहीदाभोलकर यांच्या ट्रस्टमध्ये घोटाळे झाल्याचा उल्लेख वारंवार होत असूनही त्याची कधीही चौकशी झाली नाहीडॉदाभोलकर किंवा कॉपानसरे कोणत्या व्यवस्थेविरोधात लढत होतेहे कधीही स्पष्ट करण्यात आले नाहीत्यामुळे त्यांचे पुरोगामीत्व बेगडी होते.’’

देशद्रोह्यांना पाठिंबातर हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न! – श्रीरमेश शिंदे

      पुरोगामी सातत्याने कॉपानसरे आणि डॉदाभोलकर यांच्या हत्या म्हणजे भारतीय घटनेवर आक्रमण असल्याचे भासवतातपरंतुदुसरीकडे देशावर आक्रमण करणार्‍या जिहादी कसाबपासून याकूब मेमनपर्यंत प्रत्येकाला वकील उपलब्ध करून दिला जातोमात्र कोल्हापूर येथे दबाव निर्माण करून हिंदुत्वनिष्ठांचा  खटला स्थानिक वकील चालवणार नाहीतअसा प्रस्ताव मंजूर केला जातोआतंकवाद्यांसाठी मानवाधिकार आहेतपण हिंदुत्वनिष्ठांसाठी नाहीत कादेशविरोधी कारवाया करणार्‍या शरजीलला जामीन मिळावा म्हणून गळे काढले जातातपण हिंदुत्वनिष्ठांना मात्र आतंकवादी ठरवण्याचा प्रयत्न होतोत्यामुळे देशद्रोही आणि गद्दारांना पाठिंबा देत हिंदुत्वनिष्ठांना आतंकवादी ठरवण्याचे हे साम्यवादी षड्यंत्र आहेअसे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्रीरमेश शिंदे यांनी नमूद केले.