ज्येष्ठ नागरिकांसाठी जेनएसतर्फे सिनियर मॅरेथाँनचे आयोजन

जेनएस लाइफसोबत सहयोगाने द सिम्‍पल स्‍टेप्‍स फिटनेस ग्रुपने विशेषत: ६० वर्ष व त्‍यापेक्षा अधिक वय असलेल्‍या ज्‍येष्‍ठ नागरिकांसाठी पुण्‍यातील प्रमुख रनिंग इव्‍हेण्‍ट सिम्‍पल स्‍टेप्‍स एजलेस वंडर वॉक एन जॉगच्‍या चौथ्‍या पर्वाची घोषणा केली आहे. यंदाचा इव्‍हेण्‍ट पुणे युनिव्‍हर्सिटी स्‍पोर्ट्स कॉम्‍प्‍लेक्‍स येथे २३ फेब्रुवारी २०२५ रोजी आयोजित करण्‍यात आला आहे, जो भारतातील ६० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्‍या व्‍यक्‍तींच्‍या समुदायाला सक्षम करण्‍यासाठी विशेषरित्‍या डिझाइन करण्‍यात आलेला क्रांतिकारी डिजिटल प्‍लॅटफॉर्म जेनएस लाइफसोबत महत्त्वपूर्ण सहयोगाला सादर करतो.

या इव्‍हेण्‍टमध्‍ये विभिन्‍न फिटनेस लेव्‍हल्‍ससाठी डिझाइन केलेल्‍या तीन श्रेणींचा समावेश आहे: नॉन-कॉम्‍पीटिटिव्‍ह ३ किमी फन रन आणि कॉम्‍पीटिटिव्‍ह ५ किमी व १० किमी रेसेस्. विशेष ‘अॅथलीट ऑन व्‍हील्‍स’ श्रेणी विकलांग सहभागींना सर्वसमावेशकतेची खात्री देते. या इव्‍हेण्‍टने उल्‍लेखनीय वाढ केली आहे, जेथे सहभागींची संख्‍या २०२२ मधील २०० रनर्सवरून यंदा ८०० सहभागींपर्यंत वाढण्‍याची अपेक्षा आहे.

जेनएस लाइफच्‍या संस्‍थापिका मीनाक्षी मेनन म्‍हणाल्‍या, “सिम्‍पल स्‍टेप्‍स एजलेस वंडरमध्‍ये प्रत्‍येक फिनिशरमध्‍ये मानवी उत्‍साहाची असाधारण क्षमता आहे. ज्‍येष्‍ठ नागरिक फिनिशर्स आहेत, ते मेहनत घेत व सक्रिय राहत या टप्‍प्‍यापर्यंत पोहोचले आहेत. आपल्‍या प्रत्‍येकाची आरोग्‍यदायी व तंदुरूस्‍त राहण्‍याची इच्‍छा आहे. तसेच आपली वाढत्‍या वयासह येणाऱ्या वेदना व त्रास टाळण्‍याची देखील इच्‍छा आहे. याच कारणामुळे आम्‍ही ज्‍येष्‍ठ नागरिकांना पुढे जात राहण्‍यास प्रेरित करतो. ६० वर्षांहून अधिक वय असलेल्‍या सहभागींमध्‍ये मला दिसलेला अभिमान अविश्‍वसनीय आहे.

जीवन जगण्‍याच्‍या या धावपळीमधूनच समाधान मिळते. ते रेस धावण्‍यासोबत जगाला दाखवून देत आहेत की, त्‍यांना वयाचे कोणतेच बंधन नाही. या ज्‍येष्‍ठ नागरिकांमध्‍ये आजही तोच उत्‍साह आहे. म्‍हणून आम्‍ही म्‍हणतो की, आम्‍ही आयुष्‍य वाढवण्‍यासोबत जीवनाचा आनंद घेण्‍यासाठी धावत आहोत.”

“रनिंगमुळे शारीरिक क्षमता वाढते, तसेच वय कितीही असले तरी आपल्‍या प्रत्‍येकामध्‍ये असलेल्‍या क्षमता अधिक दृढ होतात. यंदा आम्‍हाला जेनएस सारख्‍या अत्‍यंत प्रेरणादायी ब्रँडसोबत सहयोग करण्‍याचा अभिमान वाटतो, जो भारतातील ६० वर्षांहून अधिक वय असलेल्‍या पिढीला सक्षम करण्‍याप्रती समर्पित आहे,” असे सिम्‍पल स्‍टेप्‍स फिटनेसचे संस्‍थापक आणि बॅडवॉटर १३५ अल्‍ट्रा मॅरेथॉन फिनिशर आशिष कसोडेकर म्‍हणाले.

यंदाच्‍या एडिशनमध्‍ये अद्वितीय सांस्‍कृतिक कार्यक्रम सादर करण्‍यात आले आहेत, जेथे मुंबई व पुण्‍यातील वरिष्‍ठ डान्‍सर्स इव्‍हेण्‍टमध्‍ये परफॉर्म करतील, ज्‍यामधून चिरस्‍थायी जीवनाची क्षमता दिसून येईल. या रेससोबत अद्वितीय सेलिब्रेशन देखील असेल, जेथे २२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्‍यात येणाऱ्या प्री-इव्‍हेण्‍ट एक्‍स्‍पोमध्‍ये विंटेज कारचे प्रदर्शन, जुन्‍या गाण्‍यांवरील परफॉर्मन्‍स, हास्‍य योग सत्रे आणि सर्वसमावेशक आरोग्‍य कार्यशाळांचा समावेश आहे.

जेनएस लाइफचा कम्‍युनिटी अॅप पार्टनर म्‍हणून सहयोग सक्रिय, कनेक्‍टेड सीनियर समुदायाला चालना देण्‍याप्रती इव्‍हेण्‍टच्‍या मिशनशी परिपूर्णपणे संलग्‍न आहे. डिजिटल प्‍लॅटफॉर्म तंत्रज्ञान-सक्षम सहभाग आणि समुदाय निर्मितीच्‍या माध्‍यमातून सहभागींच्‍या अनुभवाला अधिक उत्‍साहित करेल.

सहभागींना फिनिशर मेडल्‍स, ई-सर्टिफिकेट्स आणि गूडी बॅग्‍ज, तसेच ६०-६४ वर्ष ते ८५ वर्षांहून अधिक वय अशा विविध वयोगटांमध्‍ये स्‍पेशल बक्षीसे मिळतील. या इव्‍हेण्‍टमध्‍ये स्‍पर्धा व समुदायासोबत रनर्ससाठी टाइम चिप ट्रॅकिंग सारखी वैशिष्‍ट्ये आणि समर्पित रिफ्रेशमेंट स्‍टेशन्‍स आहेत.

नोंदणी www.townscript.com/e/simple-steps-ageless-wonder-walknjog-edition-4 या वेबसाइटच्‍या माध्‍यमातून सुरू आहे, जेथे प्रवेश शुल्‍क ३ किमी श्रेणीसाठी ४०० रूपयांपासून १० किमी रेससाठी ६०० रूपयांपर्यंत आहे. कुटुंबातील सदस्‍य २०० रूपयांच्‍या अतिरिक्‍त शुल्‍कासह सहभागींसोबत येऊ शकतात.