एयर इंडियातर्फे जगभरात २ ते ६ फेब्रुवारीदरम्यान ‘नमस्ते वर्ल्ड’ सेलचे आयोजन

  • पहिल्या दिवशी सेलमधील भाडेशुल्क वेबसाइट आणि मोबाइलवर उपलब्ध
  • आकर्षक प्रमोशनल भाडेशुल्क, कन्व्हिनियन्स शुल्क नाही आणि एयर इंडियाची वेबसाइट आणि मोबाइल अपवर खास पेमेंट ऑफर्स

एयर इंडिया या भारतातील आघाडीच्या विमानवाहतूक कंपनीने ‘नमस्ते वर्ल्ड’ या जागतिक सेलची घोषणा केली असून त्याअंतर्गत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानप्रवासावर कॅबिन क्लासेसवर आकर्षक प्रमोशनल भाडेशुल्काचा लाभ घेता येणार आहे.

एयर इंडियाचा ‘नमस्ते वर्ल्ड’ सेल २ फेब्रुवारी २०२५ रोजी ०००१ तासापासून ६ फेब्रुवारी २०२५ रोजी २३५९ तासापर्यंत १२ फेब्रुवारी ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यानच्या प्रवासासाठी सुरू राहाणार आहे. या सेलअंतर्गत केली जाणारी बुकिंग्ज परकीय चलनात करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पॉइंट ऑफ सेलसाठी उपलब्ध असतील, तसेच त्यावर इंडियन पॉइंट ऑफ सेलचा फायदाही मिळणार आहे.

‘आमचा नमस्ते वर्ल्ड सेल योग्य वेळी सुरू होत असून त्यामुळे ग्राहकांना त्यांच्या आगामी उन्हाळी सुट्ट्यांसाठी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाचे नियोजन करता येईल. बुकिंगसाठी मोठा कालावधी उपलब्ध असल्याने आम्हाला खात्री आहे, की ग्राहकांना या खास प्रमोशनचा लाभ मिळेल व एयर इंडियाची आकर्षक उत्पादने व सेवांचा अनुभव घेता येईल,’ असे एयर इंडियाचे चीफ कमर्शियल ऑफिसर निपुण अगरवाल म्हणाले.

प्रीमियम कॅबिन्ससाठी खास शुल्क

‘नमस्ते वर्ल्ड’ सेलमध्ये बिझनेस क्लास आणि प्रीमियम इकॉनॉमीसारख्या प्रीमियम कॅबिन्सवर आकर्षक भाडेशुल्क मिळणार असून त्यामुळे लक्झरी विमानप्रवासाचा अनुभव प्रवाशांसाठी सहजपणे उपलब्ध होईल. प्रीमियम कॅबिन्सशिवाय सेलमधील भाडेशुल्क इकॉनॉमी क्लाससाठीही उपलब्ध आहे.

सर्वसमावेशक, एका मार्गावरील देशांतर्गत भाडेशुल्क इकॉनॉमी क्लाससाठी १४९९ रुपयांपासून, प्रीमियम इकॉनॉमीसाठी ३७४९ रुपयांपासून आणि बिझनेस क्लाससाठी ९९९९ रुपयांपासून सुरू होणार आहे. आंतरराष्ट्रीय मार्गावर इकॉनॉमी रिटर्नचे शुल्क १२,५७७ रुपयांपासून, प्रीमियम इकॉनॉमी शुल्क १६,२१३ रुपयांपासून, तर बिझनेस क्लासचे शुल्क २०,८७० रुपयांपासून सुरू होणार आहे.

वेब- एक्सक्लुसिव्ह पहिला दिवस

‘नमस्ते वर्ल्ड’ सेल एयर इंडियाच्या वेबसाइटवर तसेच मोबाइल अपवर २ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होणार आहे. त्याशिवाय या सेलअंतर्गत बुकिंग सर्व चॅनेल्सवर उपलब्ध असतील. त्यामध्ये एयर इंडियाची वेबसाइट, मोबाइल अप, एयरपोर्ट तिकिटिंग ऑफिस, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर आणि ट्रॅव्हल एंजट्सचा समावेश असेल.

वेबसाइट आणि मोबाइल अप बुकिंग्जसाठी खास लाभ

या सेलदरम्यान एयर इंडियाच्या ग्राहकांना कंपनीची अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल अपवरून केलेल्या बुकिंग्जवर अतिरिक्त लाभ मिळेल. या लाभांमध्ये पुढील बाबींचा समावेश असेल –

  • शून्य कन्व्हिनियसन्स शुल्क – २ ते ६ फेब्रुवारी २०२५ दरम्यान एयर इंडियाद्वारे कोणत्याही प्रकारचे कन्व्हिनियन्स शुल्क आकारले जाणार नाही. यामुळे प्रवाशांना सेलचा एक भाग उपलब्ध करण्यात आलेल्या प्रमोशनल भाडेशुल्कामुळे आंतरराष्ट्रीय बुकिंग्जवर ९९९ रुपयांची बचत करता येईल आणि देशांतर्गत बुकिंग्जवर ३९९ रुपयांची बचत करता येईल.
  • बँक ऑफर्स: एयर इंडियाने बँक भागिदारांच्या मदतीने विविध पेमेंट ऑफर्सद्वारे अधिक सवलत प्रवाशांसाठी उपलब्ध केली असून त्यांना आणखी बचत करणे शक्य होणार आहे.
बँक ऑफर प्रोमो कोड
 

आयसीआयसीआय बँक

देशांतर्गत (राउंड ट्रिप): थेट ₹750 ची सवलत ICICI750
आंतरराष्ट्रीय: थेट ₹2,500 ची सवलत ICICI2500
बिझनेस क्लास: थेट ₹3,000 ची सवलत ICICI3000
 

अक्सिस बँक

देशांतर्गत (राउंड ट्रिप): थेट ₹750 ची सवलत AXISDOM
आंतरराष्ट्रीय: थेट ₹2,500 ची सवलत AXISINT
बिझनेस क्लास: थेट ₹3,000 ची सवलत AXISBIZ
 

फेडरल बँक

देशांतर्गत (राउंड ट्रिप): थेट ₹750 ची सवलत FED750
आंतरराष्ट्रीय: थेट ₹2,500 ची सवलत FED2500
बिझनेस क्लास: थेट ₹3,000 ची सवलत FED3000
बॉबकार्ड देशांतर्गत (राउंड ट्रिप): थेट ₹500 ची सवलत BOBDOM500
आंतरराष्ट्रीय: थेट ₹2,000 ची सवलत BOBINT2000

 

एयर इंडियाची वेबसाइट आणि मोबाइल अपवर अतिरिक्त सवलतीशिवाय पेमेंट्सचे इतर प्रकार स्वीकारले जातात. त्यामध्ये भारत व भारताबाहेरील प्रमुख बँकांची डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स, रूपे कार्ड्स आणि पेमेंट वॉलेट्सचा समावेश आहे.

  • एक्सक्लुसिव्ह प्रोमो कोड: ग्राहकांना मूलभूत शुल्कावर ‘FLYAI’ हा कोड वापरून १००० रुपयाची तत्काळ सवलत मिळवता येईल. हा प्रोमो कोड देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पॉइंट ऑफ सेलवर (परकीय चलनासाठी लागू) उपलब्ध असेल. 

सँपल, रिटर्न, ऑल- इनक्लुसिव्ह, शुल्क (एक्स- भारत, केवळ पार्शियल लिस्टिंग्ज)

 

सेक्टर करन्सी इकॉनॉमी प्रीमियम

इकॉनॉमी

बिझनेस क्लास
भारत-सिंगापूर रुपये 14,709 22,603 43,971
भारत -गल्फ रुपये 18,024 23,657 35,087
भारत -थायलंड रुपये 24,025 32,160 71,213
भारत -युरोप रुपये 36,000 68,500 1,81,999
भारत -युके रुपये 48,327 1,19,992 2,17,000
भारत -ऑस्ट्रेलिया रुपये 49,699 NA 1,79,999
भारत -अमेरिका रुपये 63,271 1,43,263 2,26,296
भारत -कॅनडा रुपये 80,500 NA 1,94,999

 

सँपल, रिटर्न, ऑल- इनक्लुसिव्ह, शुल्क (एक्स- भारत, केवळ पार्शियल लिस्टिंग्ज)

 

सेक्टर करन्सी इकॉनॉमी प्रीमियम

इकॉनॉमी

बिझनेस क्लास
सिंगापूर- भारत SGD 233 376 740
युएई- भारत AED 652 909 3,427
कतार- भारत QAR 1,039 1,162 2,758
सौदी अरेबिया- भारत SAR 589 929 2,527
थायलंड- भारत THB 8,384 14,566 26,206
युरोप- भारत EUR 470 910 1,829
युके- भारत GBP 510 934 1,974
ऑस्ट्रेलिया- भारत AUD 729 NA 5,299
अमेरिका- भारत USD 540 1,438 2,628
कॅनडा- भारत CAD 1,430 NA 2,625

 

‘नमस्ते वर्ल्ड’ सेलअंतर्गत एयर इंडियाचे संकेतस्थळ आणि मोबाइल अपवर बुकिंग खुली आहेत आणि नंतर एयरपोर्ट तिकिटिंग ऑफिस, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर आणि ट्रॅव्हल एंजट्सद्वारेही खुली केली जातील.

सेलमधील सीट्स मर्यादित असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावर उपलब्ध आहेत. हा सेल निवडक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मार्गावर उपलब्ध असून भाडेशुल्कात शहरानुसार लागू होणारा विनिमय दर आणि करानुसार किंचित बदल असतील. देशांतर्गत बुकिंग्जचा कालावधी १५ सप्टेंबर २०२५ रोजी संपणार असून आंतरराष्ट्रीय बुकिंग्जचा कालावधी संबंधित ठिकाणानुसार वेगळा असेल.